Us Isreal-Iran War अमेरिकेचा इराणवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; अत्यंत महत्त्वाच्या खर्ग बेटावरील सर्व लष्करी तळ उद्ध्वस्त
अमेरिकन सैन्याने इराणच्या अत्यंत महत्त्वाच्या खर्ग बेटावर मोठा हल्ला केला आहे. अमेरिकेने खर्ग बेटावर तूफान बॉम्बहल्ले करत तेथील सर्व लष्करी तळ उद्ध्वस्त केल्याचा दावा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. या युद्धातील हा आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली हल्ला असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या १५ व्या दिवशी अमेरिकेने हे मोठे पाऊल उचलले आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडियावरून माहिती देताना सांगितले की, अमेरिकन सेंट्रल कमांडने (CENTCOM) त्यांच्या आदेशानुसार खर्ग बेटावरील सर्व लष्करी तळांना पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे. “काही वेळापूर्वीच माझ्या आदेशानंतर अमेरिकन सैन्याने मध्यपूर्वेच्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली बॉम्बहल्ले केले. आम्ही इराणसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘खर्ग बेटा’वरील प्रत्येक लष्करी लक्ष्य उद्ध्वस्त केले आहे. आमची शस्त्रे जगातील सर्वात प्रगत आहेत. माणुसकीच्या नात्याने मी सध्या तिथल्या तेल पायाभूत सुविधांना धक्का लावलेला नाही, पण इराणने सावध राहावे”, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.
‘खर्ग बेट’ का आहे महत्त्वाचे?
इराणच्या खनिज तेल निर्यातीचा ९०% हिस्सा याच बेटावरून हाताळला जातो. हे इराणचे सर्वात मोठे तेल टर्मिनल आहे. जर हे केंद्र निकामी झाले, तर इराणची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडू शकते.
Comments are closed.