इराणचा USS अब्राहम लिंकनवर हल्ला?

विमानवाहू युद्धनौकेला नुकसान पोहोचल्याचा दावा : अमेरिकेकडून प्रत्युत्तर

इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने अमेरिकेची शक्तिशाली विमानवाहू युद्धनौका यूएसएस अब्राहम लिंकनवर हल्ल्याचा दावा केला आहे. एका बॅलेस्टिक क्षेपणास्त्राने यूएसएस अब्राहम लिंकनला लक्ष्य केले आहे. या हल्ल्यामळे युद्धनौका काम करण्याच्या स्थितीत राहिली आणि तिला या आखाती जलक्षेत्रातून मागे हटावे लागल्याचा दावा आयआरजीसीने केला. परंतु अमेरिकेने हा दावा फेटाळला आहे.

एका अचूक क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्याने अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका अब्राहम लिंकनला लक्ष्य केले. ओमानच्या जलक्षेत्रात युद्धनौकेवर हल्ला करण्यात आले. इराणच्या सागरी सीमेपासून सुमारे 340 किलोमीटर अंतरावर हे यश मिळाल्याचा दावा इराणने एक वक्तव्य जारी करत केला. हल्ल्यानंतर अमेरिकेची युद्धनौका आणि त्याचा स्ट्राइक ग्रुप मागे हटल्याचेही इराणचे सांगणे आहे.

अमेरिकेचे काय सांगणे?

अमेरिकेने इराणचा हा दावा नाकारला आहे. युएस सेंट्रल कमांडने यूएसएस अब्राहम लिंकनचे एक छायाचित्र शेअर करत अब्राहम लिंकन कॅरियर स्ट्राइक ग्रूप, ऑपरेशन एपिक फ्यूरीत सातत्याने मदत करत असल्याचे नमूद केले आहे.

अमेरिकेसाठी महत्त्वपूर्ण विमानवाहू युद्धनौका

यूएसएस अब्राहम लिंकन अमेरिकेच्या नौदलाच्या सर्वात शक्तिशाली युद्धनौकांपैकी एक आहे. अशास्थिती यावर हल्ला झाला असल्यास तो अमेरिकेसाठी मोठा झटका ठरणार आहे. यूएसएस अब्राहम लिंकन निमित्ज श्रेणीची पाचवी युद्धनौका आहे. ही आण्विक ऊर्जेने संचालित युद्धनौका असून ती दक्षिण चीन समुद्रात तैनात राहते. या युद्धनौकेला अमेरिकेच्या नौदलात 1989 साली सामील करण्यात आले होते. 97 हजार टन वजनाच्या या युद्धनौकेचा फ्लाइट डेक सुमारे 4.5 एकरमध्ये फैलावलेला आहे. याची लांबी सुमारे 1092 फूट आहे. यात 4 हँगर एलिवेटर असून ही स्वत:सोबत 90 लढाऊ विमाने नेऊ शकते. याच्या डेकवर अमेरिकेचे सर्वात आधुनिक लढाऊ विमान एफ-35 सी तैनात आहे. युद्धनौकेवर 5 हजारांहून अधिक नौसैनिक, मरीन आणि क्रूचे सदस्य तैनात आहेत. ही जगातील सर्वात मोठी युद्धनौका असून तिचा स्वत:चा जिप कोड, टीव्ही आणि रेडिओ स्टेशन, वृत्तपत्र, अग्निशमन  केंद्र, वाचनालय, रुग्णालय, जनरल स्टोअर आहे.

Comments are closed.