बाईक अडवून डोळ्यात मिरची पूड टाकली; कत्ती, लोखंडी रॉडने मारलं, बीडमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला,

केज: तालुक्यातील तांबवा परिसरात गुन्हेगारीच्या घटनांनी डोके वर काढले असून, जुन्या वादातून एका तरुणावर प्राणघातक हल्ला (Beed Crime News) झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पाच जणांच्या टोळक्याने संगनमत करून तरुणाला रस्त्यात अडवले आणि लोखंडी रॉडसह धारदार शस्त्राने गंभीर (Beed Crime News) जखमी केले. याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.(Beed Crime News)

Beed Crime News: नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, तांबवा येथील रहिवासी नरसिंग उर्फ संग्राम अभिमान चाटे हे गुरुवारी दुपारी आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून जात होते. दुपारी दीडच्या सुमारास तांबवा जिल्हा परिषद शाळेजवळ दबा धरून बसलेल्या आरोपींनी त्यांची गाडी अडवली. जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून दया विलास चाटे याने संग्रामच्या डोक्यावर कत्तीने जोरदार वार केला.(Beed Crime News)

Beed Crime News: अमानुष मारहाण आणि मिरचीपूडचा वापर

हल्ला करताना आरोपींनी अत्यंत क्रूर पद्धतीचा अवलंब केला. शरद परमेश्वर चाटे याने संग्रामच्या डोळ्यांत मिरचीपूड (Beed Crime News) फेकली, ज्यामुळे त्याला प्रतिकार करणे कठीण झाले. त्यानंतर अमोल ठोंबरे, सागर चाटे आणि गोट्या भालेकर यांनी लोखंडी रॉडने संग्रामच्या पाठीवर, मानेवर आणि खांद्यावर बेदम प्रहार केले. या अमानुष मारहाणीत संग्राम जागीच बेशुद्ध पडला. त्याला तातडीने उपचारासाठी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.(Beed Crime News)

Beed Crime News: पाच जणांवर गुन्हे दाखल

पीडित संग्राम चाटे याने दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी दया चाटे, शरद चाटे, अमोल ठोंबरे, सागर चाटे आणि गोट्या भालेकर या पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. केज शहर आणि ग्रामीण भागात वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलीस निरीक्षक स्वप्निल उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुकुमार बनसोडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.(Beed Crime News)

आणखी वाचा

Comments are closed.