VIDEO: आयपीएल 2026 मध्ये ‘या’ फलंदाजाची 37 वी धाव असेल महत्वाची, रिषभ पतंने गिफ्ट दिली स्वत:ची बॅट

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६चा हंगाम लवकरच सुरू होणार आहे. यासाठी प्रत्येक संघांने त्यांचे कॅम्प (शिबीर) सुरू केले आहेत. त्यामध्ये लखनऊ सुपर जायंट्स (एलएसजी) संघही मागे राहिला नाही. त्यांनीही सरावाला जोरदार सुरूवात केली आहे. यामध्ये त्यांचा कर्णधार रिषभ पंतदेखील आहे. सरावादरम्यान त्याने एका फलंदाजाला त्याची बॅट भेट म्हणून दिली. त्या फलंदाजाची १९व्या आयपीएल हंगामातील ३७वी धाव मौल्यवान असणार आहे.
लखनऊ सुपर जायंट्सने पंतचा बॅट देतानाचा व्हिडिओ शेयर केला आहे. त्यामध्ये पंत त्याच्या बॅगमधून बॅट काढून लखनऊचा खेळाडू आयुष बदोनीला देताना दिसत आहे. त्या व्हिडिओमध्ये सुरूवातीला आयुषला ती बॅट कोणाची आहे? असे विचारले होते. त्यावर तो म्हणाला, “तुम्हाला माहित नाही का?” आणि बॅट दाखवत असून त्यावर आरपी १७ लिहिलेले दिसते.
पंतकडून बॅट मिळाल्यानंतर आयुष खूप आनंदी झाला. पंतने त्याला बॅट देताना म्हटले, “ही एक उत्तम बॅट आहे. त्यावर केवळ टेप लाव.” त्यावर आयुष म्हणाला, “टेप, काही अडचण नाही.”
आयुष आयपीएलमधील एक मोठा टप्पा गाठण्याच्या जवळ आहे. त्याने २०२६च्या हंगामत ३७ धावा पूर्ण करताच त्याच्या आयपीएलमधील १००० धावा पूर्ण होतील. सध्या त्याने ५६ सामन्यांच्या ४६ डावात ९६३ धावा केल्या आहेत. यामुळे या हंगामात ३७ धावा करताच तो १००० धावांचा टप्पा गाठणार.
आयुषने लखनऊकडूनच खेळताना या सर्व धावा केल्या आहेत. त्याने २०२२मध्ये आयपीएल पदार्पण केले होते. तसेच त्याने २०२५च्या हंगामात सर्वोत्तम कामगिरी केली होती. त्याने १४ सामन्याच्या ११ डावात खेळताना ३२९ धावा केल्या होत्या.
आयपीएल २०२६ मध्ये एलएसजीचा पहिला सामना १ एप्रिलला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आहे. हा सामना लखनऊच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी ७.३० वाजता खेळला जाणार आहे. दुसरा सामना ५ एप्रिलला सनरायझर्स हैद्राबादविरुद्ध, तिसरा सामना ९ एप्रिलला कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आणि चौथा सामना १२ एप्रिलला गुजरात टायटन्सविरुद्ध आहे.
Comments are closed.