आता LPG फ्री मिळणार, फक्त नाक बंद ठेवून श्वास घ्या; संजय राऊत यांचा सणसणीत टोला

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इराण-इस्रायल-अमेरिकेमधील युद्धामुळे हिंदुस्थानात LPG सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक हॉटेल्स, खाद्यपदार्थांचे छोटे व्यवसाय सिलिंडर उपलब्ध नसल्याने सध्या ठप्प झाले आहेत. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र देशात LPG चा तुटवडा नसल्याचे म्हटले आहे. पंतप्रधानांनी 2018 साली गटारातून गॅस निर्माण बनवण्याचे एक वक्तव्य केले होते. सध्या देशात निर्माण झालेल्या LPG गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर हे जुने वक्तव्य पुन्हा चर्चेत आले आहे. या गटार गॅसच्या वकत्यावरून सध्या विरोधकांनी देखील पंतप्रधानांना धारेवर धरले आहे.

पंतप्रधानांच्या याच वक्तव्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदींना सणसणीत टोला लगावला आहे. ”ब्रेकिंग – मिठी नदी नाल्यात जगातील सर्वात मोठा नैसर्गिक गॅसचा भांडार सापडला आहे. भाजपने त्याला तत्काळ राष्ट्रीय संपत्ती घोषित करण्याची मागणी केली आहे. आता आता LPG फ्री मिळणार, फक्त नाक बंद ठेवून श्वास घ्या”, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

पंजाबमध्ये एका ज्येष्ठ नागरिकाचा सिलिंडरच्या रांगेत मृत्यू झाला आहे.  बरनाला जिल्ह्यात शैहना गावात दोन तासांपासून रांगेत उभ्या असलेल्या 66 वर्षीय कुमार मित्तल यांचा हार्ट अॅटॅकमुळे मृत्यू झाला

Comments are closed.