पाकिस्तानला झटका, एक अब्ज डॉलरची मदत रखडली

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तान मोठा झटका बसला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) हा धक्का दिला आहे. आयएमएफकडून पाकिस्तानला मिळणार्या सात अब्ज डॉलरच्या कर्जाच्या हप्त्यावर स्थगिती आली आहे. आयएमएफ आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधित करार होऊ शकला नाही. करार झाला असता तर पाकिस्तानला 1 अब्ज डॉलरची मदत मिळाली असती. ती आता मिळणार नाही. असे झाले तरी आयएमएफने पाकिस्तानसोबतच्या पॉलिसीवर चर्चा करू असे आश्वासन दिले. पाकिस्तानच्या आर्थिक संकटावरही आयएमएफने चिंता व्यक्त केली.

Comments are closed.