हिंदुस्थानातील मोबाईल मार्केटला झटका, युद्धामुळे 25 हजार कोटींचे नुकसान होण्याचा अंदाज
आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे हिंदुस्थानातील मोबाईल बाजारावर मोठा परिणाम झाला आहे. उद्योग क्षेत्रातील अंदाजानुसार हिंदुस्थानी स्मार्टपह्न बाजाराला सुमारे 3 अब्ज डॉलर्स (सुमारे 25 हजार कोटी रुपये) इतके नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जागतिक पातळीवर स्मार्टपह्न उत्पादनासाठी लागणारे अनेक महत्त्वाचे घटक चीन, तैवान, दक्षिण कोरिया आणि मध्यपूर्वेतील काही भागांमधून येतात. या मार्गावर युद्धामुळे निर्माण झालेला तणाव, जहाज वाहतुकीतील अडथळे आणि विमा खर्च वाढल्याने पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे.
विशेषतः होर्मुझ सामुद्रधुनी परिसरातील तणावामुळे तेल आणि मालवाहतूक जहाजांची हालचाल कमी झाली आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स उद्योगासाठी लागणाऱ्या चिप्स, बॅटरी आणि इतर घटकांच्या पुरवठय़ात उशीर होत आहे. हिंदुस्थानात मोठय़ा प्रमाणावर स्मार्टपह्न असेंब्ली केली जाते. अॅपल, सॅमसंग, शाओमी, व्हिवो आणि ओपो यांसारख्या कंपन्यांचे उत्पादन हिंदुस्थानात होते. मात्र कच्च्या मालाच्या पुरवठय़ात अडथळे आल्यामुळे उत्पादनाचे वेळापत्रक बिघडत आहे.
l पुरवठा कमी आणि मागणी कायम असल्यामुळे स्मार्टपह्नच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. चिप्स, डिस्प्ले पॅनेल आणि लॉजिस्टिक खर्च वाढल्याने कंपन्यांना अतिरिक्त खर्च ग्राहकांवर टाकावा लागू शकतो. अशातच काही मोबाईल कंपन्यांनी उत्पादन कमी करण्याचा किंवा नवीन मॉडेल लाँच पुढे ढकलण्याचा विचार करत आहेत.
l हिंदुस्थानातील स्मार्टपह्न बाजार हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा बाजार आहे. त्यामुळे पुरवठा साखळीतील कोणतीही अडचण थेट विक्री आणि उत्पादनांवर परिणाम करते. हिंदुस्थानातून अमेरिका आणि युरोपमध्ये मोठय़ा प्रमाणात मोबाईल निर्यात होते. युद्धामुळे निर्यात मंदावू शकते. तज्ञांच्या मते युद्धपरिस्थिती लांबली तर मोबाईल बाजारातील नुकसान आणखी वाढू शकते.
Comments are closed.