बाबर आझम मानसिकदृष्ट्या अनफिट; माजी पाकिस्तानी खेळाडूचा खळबळजनक दावा! हेड कोचवरही साधला निशाणा

टी-20 वर्ल्ड कप 2026 (icc T20 international world cup 2026) मधील पाकिस्तानच्या लाजीरवाण्या कामगिरीनंतर, 14 मार्च रोजी पीसीबीने (PCB) एक पत्रकार परिषद घेतली होती. यामध्ये निवड समितीचे सदस्य आकिब जावेद यांनी खुलासा केला की, बाबर आझम (Babar Azam) फिट नसल्यामुळे त्याला बांगलादेशविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी निवडले गेले नाही. आता यावर पाकिस्तानचा माजी खेळाडू बासित अली याने खळबळजनक विधान केले आहे.
बासित अली म्हणाले की, बाबर आझम शारीरिकदृष्ट्या (Physically) पूर्णपणे फिट आहे, पण तो मानसिकदृष्ट्या (Mentally) अनफिट आहे. जेव्हापासून त्याचा फलंदाजीचा क्रम बदलला गेला, तेव्हापासून त्याचा आत्मविश्वास ढासळला आहे. चुकीच्या सल्ल्यांमुळे त्याच्या खेळावर परिणाम होत आहे.
त्याचबरोबर, बासित अली यांनी पाकिस्तानचे हेड कोच मायक हेसन यांच्यावरही जोरदार टीका केली. ते म्हणाले, 15 खेळाडूंचा संघ निवडणारे हेड कोच कोण? ही काय त्यांच्या काकाची टीम आहे का?” संघ निवडीत कोचला एवढे अधिकार दिल्याबद्दल त्यांनी आकिब जावेद यांना जबाबदार धरले. तसेच, पाकिस्तान क्रिकेट उद्ध्वस्त करण्यात आकिब जावेद यांचा मोठा हात असल्याचा आरोपही बासित यांनी केला. जर संघाने आगामी काळात चांगली कामगिरी केली नाही, तर कोच मायक हेसन यांची खुर्ची धोक्यात येऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला. चुकीच्या निर्णयामुळे पाकिस्तान टीममधील वातावरण खराब होत चालले असून, संघात मोठी उथल-पुथल पाहायला मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
Comments are closed.