IPL 2026: कोलकाता नाईट रायडर्सने घेतला आतापर्यंतचा सर्वात चुकीचा निर्णय; भारतीय दिग्गजाचा केकेआरवर निशाणा

कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) आतापर्यंत आयपीएलचे तीन किताब जिंकले आहेत. 2024 मध्ये श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) नेतृत्वाखाली संघाने तिसऱ्यांदा ट्रॉफी उचलली होती, ज्यामध्ये फिल सॉल्टनेही (phil Salt) मोलाची कामगिरी केली. मात्र, 2025 च्या मेगा ऑक्शनपूर्वी या दोन्ही स्टार खेळाडूंना संघाने रिलीज केल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला होता. आता भारताचे माजी दिग्गज खेळाडू अनिल कुंबळे (Anil Kumble on KKR) यांनी केकेआरच्या या निर्णयावर कडक शब्दांत टीका केली आहे.

कुंबळे यांच्या मते, ज्या कर्णधाराने तुम्हाला ट्रॉफी जिंकून दिली, त्याला आणि फॉर्मात असलेल्या सलामीवीराला (सॉल्ट) बाहेर काढणे हा केकेआरचा आतापर्यंतचा सर्वात चुकीचा निर्णय होता. केकेआर आपल्या महत्त्वाच्या खेळाडूंना टिकवून ठेवण्यात अपयशी ठरते. त्यांच्याकडे सातत्याचा अभाव असून सध्या संघात एकही आयपीएल विजेता कर्णधार उपलब्ध नाही.

अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) अनुभवी आहे आणि त्याने मुंबई व राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व केले आहे, पण आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून तो अद्याप स्वतःला त्या उंचीवर सिद्ध करू शकलेला नाही. श्रेयस अय्यर ज्या पंजाब किंग्समध्ये गेला, त्या संघाने गेल्या 10 वर्षात फायनल खेळली नव्हती. पण श्रेयसने तिथे जाताच पहिल्याच मोसमात पंजाबला फायनलपर्यंत नेले. श्रेयस हा एक असा खेळाडू आहे ज्याला वारंवार स्वतःला सिद्ध करावे लागते आणि त्याला नेहमीच ‘अंडररेटेड’ मानले जाते. कुंबळे यांच्या मते, जर केकेआरने मुख्य खेळाडूंना संघात स्थान दिले नाही, तर त्यांना ट्रॉफीचे दावेदार मानणे कठीण होईल.

Comments are closed.