गिरगाव चॅम्पियन्स लीगचा थरार, विजेतेपदासाठी 16 संघांमध्ये रंगणार चुरस

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

दक्षिण मुंबईची मनाची क्रिकेट स्पर्धा अशी ओळख असलेल्या जीसीएल अर्थात गिरगाव चॅम्पियन्स लीगला शनिवारपासून इस्लाम जिमखाना दणक्यात सुरुवात झाली. स्पर्धेसाठी एकूण 43 संघ सहभागी झाले होते त्यातील 16 संघ पात्र ठरले आहेत. त्यांच्यात विजेतेपदासाठी चुरस रंगणार आहे.

युवा व्हिजन व गिरगाव बॉईज आयोजित गिरगाव चॅम्पियन्स लीग स्पर्धेचा शुभारंभ शनिवारी सकाळी पार पडला. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव उन्मेष खानविलकर, कार्यकारी सचिव चंद्रशेखर नाईक, युवासेना उपसचिव प्रथमेश सकपाळ, माजी एपेक्स कमिटी मेंबर मंगेश साटम, अखिल चंदनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सुनील दर्गे यांची यावेळी उपस्थिती होती. सदर स्पर्धेला मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक, शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर, विभागप्रमुख आशिष चेंबूरकर, चित्रपट निर्माते महेश पटेल यांनीही भेट दिली. स्पर्धेचा पहिला सामना यंग स्पोर्टंस क्लब विरुद्ध सरकार लायन्स यांच्यात पार पडला. यंग स्पोर्टस क्लब संघाने हा रोमांचक सामना शेवटच्या षटकात जिंकला. स्पर्धा पाहण्यासाठी क्रिकेट रसिकांनी मोठी गर्दी केली होती.

खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव

विजेता संघाला रोख एक लाख रुपये व आकर्षक चषक उपविजेता संघाला 75 हजार रुपये व आकर्षक चषक, स्पर्धेचे मालिकावीरला फ्रीज, उत्कृष्ट फलंदाज व गोलंदाज यांना टीव्ही, उदयोन्मुख खेळाडूला साउंड सिस्टिम, मॅन ऑफ द मॅचसाठी 10 आकर्षक भेट वस्तू देण्यात येत आहे.

Comments are closed.