अभिषेक शर्मावर ड्रेसिंग रुममधील खेळाडू जळायचे, संजू सॅमसनचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण

अभिषेक शर्मावर संजू सॅमसन: भारताचा युवा डावखुरा फलंदाज अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) गेल्या काही वर्षांत टी-20 क्रिकेटमध्ये पटकन आपली ओळख निर्माण केली. निर्भय आणि आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा हा ओपनर इंडियन प्रीमियर लीग तसेच भारतासाठी ICC पुरुष T20I क्रिकेट सामन्यांमध्येही प्रभावी ठरला आहे. उत्कृष्ट फॉर्ममुळे तो सध्या टी-20 आंतरराष्ट्रीय फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. दरम्यान, आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2024 मध्ये त्याचा जोडीदार राहिलेल्या संजू सॅमसन (Sanju Samson) याने त्याच्या वाढत्या लोकप्रियतेबद्दल एक मजेशीर किस्सा सांगितला.

अभिषेकसाठी होणाऱ्या चीअरमुळे बाकी खेळाडू जळायचे… – संजू सॅमसन

इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना सॅमसनने विनोदाने सांगितले की, आधी ड्रेसिंग रूममधील इतर खेळाडू अभिषेकसाठी होणाऱ्या चीअरमुळे थोडेसे जळायचे. सगळीकडे फक्त अभिषेक-अभिषेक असंच ऐकू यायचं. आम्हाला वाटायचं, लोकांना फक्त तोच दिसतो का?” असे सॅमसनने हसत सांगितले.

त्याने पुढे त्याच मजेशीर अंदाजात अभिषेकला चिडवत म्हटले की, आता संघात त्याची लोकप्रियता इतकी वाढली आहे की त्याने लवकरच लग्न करून घर बसवायला हवे. आता तो टीमचा सुपरस्टार झाला आहे. भाऊ, आता लवकर लग्न करून टाक,” असेही तो म्हणाला.

फायनलमध्ये धमाका! ठोकले अर्धशतक

टी-20 वर्ल्ड कपच्या सुरुवातीच्या काही सामन्यांत विशेष कामगिरी करता आली नाही. मात्र न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात अभिषेकने धडाकेबाज अर्धशतक झळकावत आपली क्षमता सिद्ध केली. अभिषेक म्हणाला, “भारतासाठी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये जास्तीत जास्त सामने खेळणे हे माझे मोठे स्वप्न आहे. पण आता जे माझ्या हातात नाही त्या गोष्टींचा विचार करणे मी सोडून दिले आहे. मागील दोन वर्षांत युवराज सिंग यांनी मला जे शिकवले, त्याच पद्धतीने खेळण्यावर मी लक्ष देतो.”

भारतासाठी वनडे खेळणेही माझे स्वप्न…

तो पुढे म्हणाला, “जर एखादी गोष्ट आपल्या हातात नसेल तर तिची चिंता करण्याची गरज नसते. मला फक्त चांगली कामगिरी करायची आहे आणि मी ज्या फॉरमॅटमध्ये खेळतो आहे त्यात संघाला विजय मिळवून द्यायचा आहे. पण हो, संधी मिळाली तर भारतासाठी वनडे क्रिकेट खेळणे हेही माझे स्वप्न आहे.”

हे ही वाचा –

Kuldeep Yadav Vanshika Wedding : अखेर स्पिनर कुलदीप क्लीन बोल्ड! बालमैत्रीण वंशिकासोबत घेतले सात फेरे, फोटो पाहून सगळेच थक्क, चहल-तिलकच्या डान्सने चाहत्यांना वेड लावलं

आणखी वाचा

Comments are closed.