तीन हजारांना विकलं जातंय ‘धुरंधर 2’ चे तिकीट
रणवीर सिंह आणि आदित्य धर यांचा बहुप्रतिक्षित ऍक्शन चित्रपट ‘धुरंधर 2ः द रिव्हेंज’ सध्या बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाची ऍडव्हान्स बुकींग सुरू झाली आहे. मुंबई आणि दिल्लीसारख्या शहरांमध्ये तिकिटांचे दर गगनाला भिडले आहे. बुक माय शोवरून असे दिसून आलेय की, मुंबईतील काही थिएटर्समध्ये एका तिकिटाची किंमत 3100 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. दिल्लीतही हे दर 2400 रुपयांच्या आसपास आहेत.
‘धुरंधर 2’ चित्रपट 19 मार्च 2026 रोजी प्रदर्शित होणार असला, तरी निर्मात्यांनी 18 मार्च रोजी विशेष ‘पेड प्रिह्यू’ शोज आयोजित केले आहेत. नोएडातील स्वस्त दरातील शोज संध्याकाळी 5 वाजेपासून सुरू होणार असून रात्री उशिरा 10ः30 वाजेपर्यंत हे शो चालणार आहेत.
Comments are closed.