अमेरिकेत व्हिसासाठी घातले नकली दरोडे, 11 हिंदुस्थानी नागरिकांना अटक
अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 11 हिंदुस्थानी नागरिकांवर व्हिसा फसवणूक करण्याचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. अमेरिकन सरकारी वकिलांच्या मते, ग्रीन कार्ड मिळविण्यासाठी त्यांनी दुकानांमध्ये सशस्त्र दरोडा टाकण्याचा बनाव रचला. त्यांनी दरोडय़ाच्या घटना घडवून आणल्या. दरोडा झाल्याचे भासवून किंवा या घटनांचे आपण बळी आहोत असे भासवून विशिष्ट व्हिसा मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
गुह्यांचे बळी पडलेल्या, मानसिक किंवा शारीरिक छळ सहन करणाऱ्या आणि पोलीस तपासात उपयुक्त ठरलेल्या स्थलांतरितांना यू व्हिसा दिला जातो. हा व्हिसा स्थलांतरितांना काम करण्याची परवानगी देतो आणि त्यांना 5 ते 10 वर्षांच्या आत ग्रीन कार्ड मिळविण्याचा मार्ग मोकळा करतो. जितेंद्रकुमार पटेल, महेशकुमार पटेल, संजयकुमार पटेल, दीपिका पटेल, रमेशभाई पटेल, अमिता पटेल, रौनककुमार पटेल, संगीता पटेल, मिंकेश पटेल, सोनल पटेल, मितुल पटेल अशी आरोपींची नावे आहेत.
Comments are closed.