Israel Iran War – इराणच्या कोणत्याही अटी मान्य करणार नाही, शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही! डोनाल्ड ट्रम्प यांनी केले स्पष्ट

अमेरिका, इस्रायल-इराण यांच्यातील युद्धाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. इराण माघार घेण्यास तयार नसून अनेक वर्षे युद्ध लढण्याची आमची क्षमता असल्याचे इराणने स्पष्ट केले आहे. मात्र, आता इराण चर्चेसाठी तयार आहे. त्याला आता खूप उशीर झाला आहे. त्यांनी बिनशर्त शरणागती पत्करावी, तरच हे युद्ध थांबेल. आम्ही इराणच्या कोणत्याही अटी मान्य करणार नाही, त्यामुळे शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केल्याने युद्ध आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की सध्या इराणसोबत युद्ध संपवण्यासाठी कोणताही करार करण्यात आलेला नाही. इराण आता चर्चेसाठी तयार आहे, परंतु त्यांच्या कोणत्याही अटी अमेरिकेला मान्य नाहीत. त्यांनी बिनाशर्त शरणागती पत्करावी, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले. इराण करार करू इच्छितो, परंतु मी सध्या त्यासाठी तयार नाही कारण त्यांच्या अटी योग्य नाहीत. आपण त्यांच्या कोणत्याही अटी मान्य करणार नाही. त्यामुळे आता शस्त्रसंधीचा प्रश्नच येत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की सध्या युद्ध थांबवण्यासाठी इराणशी कोणताही करार होणार नाही, कारण त्यांच्या अटी अमेरिकेला मान्य नाहीत. त्यांनी स्पष्ट केले की शस्त्रसंधीसाठी इराणला त्याचा अणुकार्यक्रम पूर्णपणे सोडून द्यावा लागेल. होर्मुझ सामुद्रधुनी सुरक्षित करण्यासाठी अनेक देशांकडून सहकार्याची चर्चा देखील समोर आली आहे.

ट्रम्प यांनी हे देखील स्पष्ट केले की कोणत्याही युद्धविराम किंवा करारासाठी एक महत्त्वाची अट म्हणजे इराणने त्याचा अणुकार्यक्रम पूर्णपणे सोडून देणे. अमेरिकेने इराणच्या अणुकार्यक्रमाला बराच काळ विरोध केला आहे. अमेरिका आणि इस्रायलमधील युद्ध तिसऱ्या आठवड्यात प्रवेश करत असताना हे विधान आले आहे. या हल्ल्यांमुळे मध्य पूर्वेतील तणाव सतत वाढत आहे, ज्यामुळे जागतिक व्यापार आणि ऊर्जा बाजारपेठांवर परिणाम होत आहे.

सततच्या हल्ल्यांमुळे आंतरराष्ट्रीय शिपिंगवर परिणाम झाला आहे आणि तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. अनेक तज्ञांचे म्हणणे आहे की ही परिस्थिती जागतिक अर्थव्यवस्थेसाठी चिंतेचे कारण बनत आहे. ट्रम्प यांनी असेही म्हटले आहे की अमेरिका अशा देशांकडून मदत मागत आहे ज्यांचे तेल व्यापार होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होतो. त्यांनी म्हटले की या देशांनी हा महत्त्वाचा सागरी मार्ग सुरक्षित करण्यासाठी योगदान द्यावे.

होर्मुझची सामुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्वाच्या सागरी मार्गांपैकी एक आहे, ज्यातून मोठ्या संख्येने तेल टँकर जातात. ट्रम्प यांनी दावा केला की अनेक देशांनी हा मार्ग सुरक्षित करण्यास मदत करण्याचे वचन दिले आहे, जरी त्यांनी त्यांची नावे उघड केली नाहीत. ट्रम्प यांनी इतर देशांना होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याचे आवाहन केले. ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर असेही लिहिले आहे की या मार्गाने तेल मिळवणाऱ्या देशांनीही त्याच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी. हा मार्ग खुला आणि सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक देश त्यांच्या युद्धनौका पाठवू शकतात असे ट्रम्प यांनी संकेतही दिले. मात्र, आता ट्रम्प यांच्या या विधानाने युद्ध अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Comments are closed.