“आधी संघातील सगळ्यांना अभिषेकचा हेवा वाटायचा,” संजू सॅमसनचा मोठा खुलासा

भारताचा स्टार सलामीवीर संजू सॅमसनने त्याचा पार्टनर अभिषेक शर्माच्या कामगिरीचे कौतुक करत त्यांची जोडी कशी संतुलित आणि सहज आहे हे पण सांगितले. त्याने त्यांच्या जोडीला अग्नी आणि अग्नी सारखी असल्याचे म्हटले आहे. दोघांनी आळीपाळीने आक्रमक खेळ केला आणि त्यांच्यात नैसर्गिक केरळ-पंजाबी बॉंड आहे, ज्यामुळे त्यांचा समजुतदारपणा वाढतो. सॅमसनने यावेळी अभिषेकच्या धाडसाचे आणि शांत स्वभावाचे कौतुक केले आहे आणि त्याच्या मैदानावरील, मैदानाबाहेरील मैत्रीबाबतही वक्तव्य केले आहे.

एका कार्यक्रमावेळी संजूने मोठा खुलासा केला आहे. त्याने म्हटले, “भारतीय खेळाडूंना अभिषेकच्या सुरूवातीच्या प्रसिद्धीबाबत, त्याला मिळणाऱ्या कौतुकांचा हेवा वाटायचा. आम्ही जेथे-जेथे जात होतो, तिथे अभिषेक-अभिषेकच ऐकायला यायचे. सर्वजण केवळ त्याच्याकडेच पाहत होते आणि का? आता तो संघाचा सुपरस्टार आहे. लवकर लग्न कर भावा.”

या स्पर्धेत संजूने त्याच्या आणि अभिषेकच्या जोडीला ‘आग आणि आग’ असे संबोधले आहे. तसेच त्या दोघांनी वेळोवेळी आक्रमकपणे कामगिरी करत संघाच्या विजयात महत्वाची भुमिका कशी पार पाडली, हे पण स्पष्ट केले आहे. तो म्हणाला, “आम्ही आग आणि बर्फ नाही, आम्ही आग आणि आग आहोत. कधी तो आक्रमक खेळतो, तर कधी मी. आमच्यात अशा प्रकारचे संयोजन चालू आहे. हे आम्ही २०२४ पासून करत आहोत. आमच्या मैत्रीमध्ये ‘केरळी-पंजाबी’ मिश्रण आहे. आमच्यासाठी सर्व काही अगदी सहजपणे घडते, त्यामुळे आम्ही त्यात उगाचच गुंतागुंत निर्माण करत नाही.”

आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६च्या अंतिम सामन्यात अभिषेक-संजू जोडीने न्यूझीलंडविरुद्ध आक्रमक सुरूवात केली होती. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या त्या सामन्यात या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी केली होती. त्यामध्ये अभिषेकने केवळ १८ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. ते या स्पर्धेच्या इतिहासातील अंतिम सामन्यातील सर्वात जलद शतक ठरले.

संजूने ८९ धावा केल्या आणि भारताने न्यूझीलंडसमोर विजयासाठी २५६ धावसंख्येचे लक्ष्य ठेवले. यामध्ये भारतीय फलंदाजीबरोबर गोलंदाजीही उत्तम झाली आणि हा सामना यजमानांनी ९६ धावांनी जिंकला. त्याबरोबरच विक्रमी तिसऱ्यांदा टी२० विश्वचषक उंचावण्याची कामगिरी केली.

Comments are closed.