Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
Kishori Pednekar on Ritu Tawde: मुंबईच्या महापौर रितू तावडे (Ritu Tawde) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. त्यांच्या नव्या कोऱ्या गाडीवर लावण्यात आलेल्या लाल-निळ्या फ्लॅश दिव्यांमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. केंद्र सरकारने मे 2017 मध्ये सामान्य सरकारी वाहनांवर लाल दिवा वापरण्यास बंदी घातली होती. व्हीआयपी संस्कृती कमी करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला होता. त्या निर्णयानंतर बहुतांश सरकारी वाहनांवरील लाल दिवे हटवण्यात आले होते. मात्र, महापौरांच्या नव्या वाहनावर पुन्हा लाल-निळे फ्लॅश दिवे दिसल्याने नियमांचे उल्लंघन होत असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. तसेच, मुंबई महापालिकेत भाजप सत्तेत आल्यानंतर व्हीआयपी संस्कृतीने पुन्हा डोके वर काढल्याचा आरोप ही विरोधकांकडून केला जात आहे. आता मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी रितू तावडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.
Kishori Pednekar on Ritu Tawde: किशोरी पेडणेकर नेमकं काय म्हणाल्या होत्या?
मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकर यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले आहे की, नियमांना ब्रेक आणि महापौरांच्या गाडीला झगमगाट, मुंबईत व्हीआयपी संस्कृतीची पुन्हा एन्ट्री? दोन दिवसांपूर्वीच महापौर मॅडम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या जीआरला दिलेल्या सूचनेला हरताळ फासला. आता तर केंद्र सरकार यांनी दिलेला निर्णयाला हरताळ फासला आहे. व्हीआयपी संस्कृती पंतप्रधान मोदी, केंद्र सरकार यांनी संपवली होती. पण, मुंबईच्या महापौरांना व्हीआयपी संस्कृतीचा मोह टाळता आला नाही. पंतप्रधान मोदी केंद्र सरकारचे निर्णय… महापौर पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी रितू तावडे यांच्यावर निशाणा साधलाय.
Comments are closed.