देशाला संबोधित करणाऱ्या व्हिडीओत नेतान्याहूंचा AI अवतार? कुछ तो गडबड है!!!
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहूं यांनी 12 मार्च रोजी एका व्हिडीओद्वारे देशाला संबोधित केले होते. त्यांच्या या संबोधनाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यातील एक गोष्ट नेटकऱ्यांना खटकली आहे. त्यामुळे नेटकरी सध्या ‘कुछ तो गडबड है!” असं म्हणत आहेत. त्यातच नेतान्याहू यांचा मृत्यू झाल्याच्या देखील वावड्या उठत आहेत.
नेमके प्रकरण काय?
12 मार्च रोजी समोर आलेल्या व्हिडीओत बेंजामिन नेतान्याहू यांच्या एका हाताला सहा बोटं असल्याचे दिसले. त्यावरून अनेकांनी हा व्हिडीओ आर्टिफिशन इंटिलिजन्स वापरून तयार केल्याचे म्हटले आहे. त्यात गेल्या काही दिवसांपासून बेंजामिन नेतन्याहू सार्वजनिक ठिकाणी दिसलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या सद्यस्थितीबाबत सोशल मीडियावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
Comments are closed.