एमएस धोनीपेक्षा ‘हा’ भारतीय विकेटकीपर सरस? दिग्गज खेळाडूच्या विधानाने क्रिकेट विश्वात खळबळ

भारतीय क्रिकेटमध्ये जेव्हा कधीही उत्कृष्ट विकेटकीपिंगचा विषय निघतो, तेव्हा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याचे नाव सर्वात वर घेतले जाते. परंतु, भारताचे माजी विकेटकीपर फलंदाज सबा करीम यांनी एक अत्यंत चकित करणारे विधान केले आहे. त्यांनी एमएस धोनी आणि रिद्धिमान साहा (Wriddhiman Saha) यांच्यापैकी नक्की सरस विकेटकीपर कोण, याचे नाव जाहीर करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
‘ईएसपीएन क्रिकइन्फो’वर सबा करीम यांच्यासोबत प्रश्नांचा एक ‘रॅपिड फायर’ सेशन पार पडला. यामध्ये त्यांना सर्वोत्तम विकेटकीपर निवडण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. या सत्राची सुरुवात नयन मोंगिया आणि दिनेश कार्तिक यांच्या नावांनी झाली. त्यानंतर एकामागून एक नावे समोर येत गेली आणि सबा करीम आपली उत्तरे देत गेले. एका टप्प्यावर जेव्हा रिद्धिमान साहा आणि एमएस धोनी ही दोन नावे समोर आली, तेव्हा सबा करीम यांनी धोनीऐवजी साहाची निवड करून सर्वांना चकित केले.
सबा करीम यांच्या मते, शुद्ध विकेटकीपिंगच्या कौशल्याचा विचार केला तर रिद्धिमान साहा (Wridhiman Saha) हा एमएस धोनीपेक्षा अधिक सरस आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम विकेटकीपर आहे. या सत्रात पुढे जेव्हा साहाच्या समोर इंग्लंडचे दिग्गज विकेटकीपर एलन नॉट यांचे नाव आले, तेव्हा मात्र सबा करीम यांनी साहाची साथ सोडली आणि एलन नॉट यांची निवड केली. अखेर, सबा करीम यांनी एलन नॉट यांनाच जगातील ‘सर्वोत्तम विकेटकीपर’ म्हणून घोषित केले.
आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या अनुभवाचा विचार केला, तर एमएस धोनी आणि रिद्धिमान साहा यांची तुलना होऊ शकत नाही. दोघांची कारकीर्द एकमेकांपासून खूप वेगळी आहे. धोनीने साहाच्या तुलनेत खूप जास्त सामने खेळले आहेत.
एमएस धोनी: ‘माही’ने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 90 कसोटी, 350 वनडे आणि 98 टी-20 सामने खेळले. त्याने कसोटीत 38, वनडेमध्ये 123 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 34 स्टंपिंग केल्या आहेत.
रिद्धिमान साहा: साहाने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 40 कसोटी आणि 09 वनडे सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 12 आणि वनडेमध्ये 1 स्टंपिंग आपल्या नावावर केली आहे.
Comments are closed.