घामामुळे शरीराला सतत खाज सुटते का? हा घरगुती उपाय करून खाज येण्यापासून तात्काळ आराम मिळवा, त्वचा स्वच्छ होईल

उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी?
चेहऱ्यावर पुरळ आल्यावर उपाय?
साधे दूध पिण्याचे फायदे?

देशभरात कडक उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे. वाढत्या उष्णतेचे परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतात. उन्हात कुठेही बाहेर गेल्यावर शरीराला खूप घाम येतो. घामामुळे शरीरातील पाणी निघून जाते. परंतु थंड जागी किंवा पंख्याखाली उभे राहिल्यानंतर शरीरातील घाम सुकतो आणि घाण शरीरावरच राहते. शरीरावर मृत त्वचा साचल्याने सतत खाज सुटणे, लाल पुरळ किंवा त्वचेचा संसर्ग होऊ शकतो. त्वचेची समस्या वाढल्यानंतर स्त्रिया बाजारात उपलब्ध अँटीपर्सपिरंट किंवा कुलिंग पावडर आणतात आणि लावतात. मात्र रासायनिक पावडरच्या वापरामुळे फारसा बदल दिसत नाही. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात थंड पदार्थांचे सेवन सतत करावे. थंड पदार्थांच्या सेवनाने शरीरातील उष्णता कमी होऊन आरोग्य सुधारते. आज आम्ही तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहोत की उन्हाळ्यात होणाऱ्या खाज आटोक्यात आणण्यासाठी कोणते उपाय करावेत. चला जाणून घेऊया.(छायाचित्र सौजन्य – istock)

खराब पचन तुमची स्मरणशक्ती कमकुवत करू शकते; अभ्यासाने समूह आरोग्य आणि मेंदू यांच्यातील दुवा उघड केला, सावध रहा!

खाज सुटण्याचे घरगुती उपाय:

वाढत्या उन्हाळ्यात शरीरातील वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी थंड दूध प्या. काहींना थंड दूध पिणे अजिबात आवडत नाही. अशावेळी गरम केलेले दूध थंड करून प्यावे. त्यामुळे पोटातील वाढलेली उष्णता कमी होण्यास मदत होईल. उन्हात बाहेर पडल्यावर शरीराला खूप घाम येतो. अशावेळी थंड पाणी न पिता दूध प्या. यामुळे एनर्जी मिळण्यासोबतच शरीर थंड राहते.

उन्हाळ्याच्या दिवसात वाढत्या उष्णतेमुळे अनेकांना पित्त आणि ऍसिडिटीचा त्रास होतो. पित्त वाढल्यामुळे पोटात जळजळ होणे, आंबट ढेकर येणे किंवा पोटात आग लागणे. याशिवाय काही लोकांना सतत तोंडाला फोड येणे, चेहऱ्यावर मोठे पिंपल्स येणे इत्यादी समस्या असतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी थंड दूध प्या. दूध प्यायल्याने पोटातील वाढलेली उष्णता कमी होते आणि शरीरालाही फायदा होतो.

खाज सुटण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात मीठ टाका. मीठ मिसळल्याने शरीरात जमा झालेले विषाणू कमी होतात आणि त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते. तसेच आंघोळ करताना साबणाऐवजी बॉडी वॉशचा वापर करावा. उष्णतेमुळे अंगावर पुरळ किंवा घाम येत असल्यास कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ करा. कडुलिंबाचे पाणी शरीरावरील जंतू नष्ट करण्यास मदत करते.

मुंबईत गोवर रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ! धारावी, गोवंडी हॉटस्पॉट; लसीकरणाकडे दुर्लक्ष करू नका

शरीरातील वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी थंड पदार्थांच्या सेवनासोबत भरपूर पाणी प्या. पाणी प्यायल्याने शरीरातील साचलेली घाण बाहेर पडून शरीर स्वच्छ राहण्यास मदत होईल. आतड्यांमध्ये साचलेल्या घाणीमुळे चेहऱ्यावर तर कधी शरीरभर मोठे पिंपल्स आणि खाज सुटते. त्यामुळे वाढत्या उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.

टीप – हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी लिहिला आहे आणि कोणत्याही प्रकारचा इलाज असल्याचा दावा करत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Comments are closed.