सान्या मल्होत्राची स्वप्नपूर्ती! मुंबईत खरेदी केलं 14 कोटींचं आलिशान घर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

‘दंगल गर्ल’ सान्या मल्होत्राने (Sanya Malhotra) अखेर मुंबईत स्वतःचं हक्काचं घर घेतलं आहे. मुंबईतील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या जुहू-वर्सोवा लिंक रोडवर तिने एक आलिशान अपार्टमेंट खरेदी केले असून, या घराची किंमत तब्बल 14.3 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

सान्याचं हे नवीन घर जुहू येथील ‘बे व्ह्यू’ (Bayview) इमारतीत आहे. सान्याच्या नव्या घरामधून समोर समुद्राचा सुंदर नजारा दिसतो. नुकतेच या घरात सान्याने पूजा घातली असून सोशल मीडियावर पूजेचे फोटो शेअर केले आहे. यात ती डोक्यावर कलश घेऊन गृहप्रवेश करताना दिसत आहे. सान्याच्या घराचे इंटीरियर अतिशय साधे पण मोहक आहे. यात पेस्टल रंग, विंटेज दिवे वापरून तिने त्याला Asthetic Look दिला आहे. यात इमारतीत अभिनेता हृतिक रोशनचे देखील घर आहे.

सान्याने सोशल मीडियावर तिच्या गृहप्रवेशाचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती पारंपरिक गुलाबी रंगाच्या साडीत पूजेला बसलेली दिसत आहे. फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “हे केवळ एक घर नसून माझ्या प्रवासाचा एक छोटासा भाग आहे. वर्षानुवर्षांचे स्वप्न, मेहनत आणि संयमाचे हे फळ आहे.”

मूळची दिल्लीची असलेल्या सान्याने २०१६ मध्ये ‘दंगल’ चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर तिने mrs., कटहल, लव्ह हॉस्टेल, मिनाक्षी सुंदरम अशा अनेक चित्रपटात काम केले आहे.

Comments are closed.