आधी मोबाईल फॉर्मेट केला, नंतर 19 वर्षीय तरुणानं राहत्या घरात सीट बेल्टनं आयुष्य संपवलं; पिंपरी-

Pimpri Chinchwad Crime : पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरातील दिघी परिसरात एका 19 वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री उघडकीस आली. अथर्व विजय देशमुख असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून आत्महत्येपूर्वी त्याने स्वतःचा मोबाईल फोन फॉर्मेट केल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अथर्व देशमुख हा दिघी येथील गंगोत्री हॉस्पिटलजवळ पार्वती भोजने यांच्या घरी भाड्याने राहत होता. रविवारी (दि.15) सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्याने राहत्या घरात सीट बेल्टच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. घटना घडली तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता.

Pimpri Chinchwad Crime : गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

दरम्यान, अथर्वने बराच वेळ प्रतिसाद न दिल्याने त्याची आई ज्योती देशमुख आणि शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी खिडकीतून घराची कडी उघडून आत प्रवेश केला असता अथर्व गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने खाली उतरवून जवळील गंगोत्री हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी पिंपरी येथील वाय.सी.एम. रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले.

Pimpri Chinchwad Crime : आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट

घटनेची माहिती मिळताच दिघी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, अथर्वच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र आत्महत्येपूर्वी त्याने आपला मोबाईल फोन फॉर्मेट केल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाबाबत विविध शक्यता व्यक्त केल्या जात असून दिघी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Pune Crime News: वाघोलीत विद्यार्थ्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; आरोपी अटकेत

दरम्यान, वाघोलीतील रायसोनी कॉलेजसमोर चहा पिण्यासाठी थांबलेल्या एका विद्यार्थ्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून हल्ल्याचा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागेश जगताप हा विद्यार्थी आपल्या मित्रासोबत हॉटेलसमोर चहा पिण्यासाठी थांबला होता. त्याच वेळी जुना वाद मनात धरून मंगेश सांगळे हा आपल्या दोन साथीदारांसह तेथे आला. सुरुवातीला दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. त्यानंतर “तू मला शिवी का दिली?” असा जाब विचारत आरोपीने नागेशवर कोयत्याने हल्ला केला.

या हल्ल्यात नागेशच्या डोक्यावर, पाठीवर आणि शरीरावर गंभीर वार झाले. हल्ला इतका भीषण होता की आरोपीने मारलेला कोयता नागेशच्या डोक्यातच अडकून राहिला. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिन्ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

आणखी वाचा

Nashik Crime News: वाढदिवशीच दहावीचा विद्यार्थी कुणालाही न सांगता आश्रमशाळेतून निघून गेला, शोधाशोध केली असता भयानक प्रकार उघड; नाशिकमध्ये खळबळ

आणखी वाचा

Comments are closed.