पाकिस्तानाचा झिम्बाब्वे झालाय? लाज वाटू द्या…; बांगलादेशविरुद्ध पराभवानंतर दिग्गज संतापला, नक
बांगलादेशने पाकिस्तानला हरवले शाहीन आफ्रिदीच्या (Shaheen Afridi) नेतृत्वाखालील पाकिस्तानला बांगलादेशविरुद्धच्या (Pakistan vs Bangladesh) तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-2 अशी पराभवाची नामुष्की पत्करावी लागली. टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर लगेचच बांगलादेशकडून असा पराभव झाल्याने पाकिस्तानच्या चाहत्यांपासून ते माजी खेळाडूंपर्यंत सर्वत्र नाराजी व्यक्त होत आहे. एका माजी क्रिकेटपटूने तर थेट पाकिस्तान संघ असोसिएट टीम बनत चालल्याचे म्हणत जोरदार टीका केली.
तिसऱ्या वनडेमध्ये पाकिस्तानसमोर 291 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. सलमान आगने (Salman Agha) शानदार शतक झळकावले, मात्र त्यानंतरही पाकिस्तानला विजय मिळवता आला नाही. संपूर्ण संघ 279 धावांवर बाद झाला आणि बांगलादेशने 11 वर्षांनंतर पाकिस्तानविरुद्ध वनडे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. या पराभवानंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू अहमद शहजाद (Ahmed Shehzad) चांगलाच संतापला.
अहमद शहजाद संतापला…
आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना अहमद शहजाद म्हणाला की, “टी-20 वर्ल्ड कपमध्ये खराब कामगिरी केल्यानंतरही तुम्ही कोणताही बदल केला नाही. अचानक नवीन खेळाडूंना संघात घेतले आणि आता मालिका हरल्यानंतर त्याच नवीन खेळाडूंना कारण म्हणून पुढे करत आहात. हे फारच विचित्र आहे. जेव्हा तुम्ही स्वतःच्या चुका मान्य करत नाही, तेव्हा आयुष्यात पुढे कसे जाणार?”
तो पुढे म्हणाला, “तुमचा संघ असोसिएट टीमसारखा होत चालला आहे. नेमक्या कोणत्या कॉम्बिनेशनने तुम्ही खेळत आहात हेच समजत नाही. टॉस जिंकल्यावर आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय का घेतला? जेव्हा वरिष्ठ खेळाडूंचेच असे वर्तन असेल, तर नव्या खेळाडूंकडून काय अपेक्षा ठेवणार?”
अहमद शहजाद याने आणखी कठोर शब्दांत टीका करत म्हटले, “तुम्ही पाकिस्तान क्रिकेटची वाट लावली आहे. जर काही सुधारणा करायची असती, तर आतापर्यंत केली असती. मोठ्या संघांविरुद्ध तुम्ही क्वचितच जिंकता आणि नंतर म्हणता की आम्ही ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण आफ्रिकेला हरवले. पण तेव्हा त्यांच्या सर्वोत्तम संघांनी खेळलेच नव्हते.”
शेवटी त्याने ताशेरे ओढत म्हटले, “लोक आता तुमच्याशी झिम्बाब्वे सारखे वागू लागले आहेत. आणि तरीही तुम्ही म्हणता की रन-रेटमुळे वर्ल्ड कपमधून बाहेर पडलो. थोडी तरी लाज बाळगा.”
🚨 पाकिस्तानसाठी आणखी एक अपमान
बांगलादेशने एकदिवसीय मालिकेत पाकिस्तानचा २-१ ने पराभव केला.
पाकिस्तान झिम्बाब्वे आणि बांगलादेशसारख्या संघांनाही हरवू शकत नाही.
आशियातील पहिल्या तीन संघांमध्येही पाकिस्तानचा समावेश नाही. अगदी श्रीलंका, अफगाणिस्तानही त्यांच्यापेक्षा खूप पुढे आहेत.
pic.twitter.com/ig10zCaYxh— निस्वार्थ⁴⁵ (@SelflessCricket) १५ मार्च २०२६
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.