शुबमन गिलला टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर का करण्यात आलं? सूर्यकुमार यादवने सांगितलं नेमकं कारण!

टी-20 विश्वचषक 2026 (Icc T20 international world cup 2026) पूर्वी शुबमन गिल (Shubman gill) भारतीय टी-20 संघाचा महत्त्वाचा भाग होता. त्याच्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारीही सोपवण्यात आली होती आणि आशिया चषक 2025 मध्ये त्याने ही भूमिका बजावली होती. मात्र, विश्वचषकापूर्वी त्याला संघातून बाहेर काढण्यात आले आणि निवडकर्त्यांनी ईशान किशनवर (Ishaan kishan) विश्वास दाखवला.

आता या निवडीमागचे नेमके कारण सांगताना भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) म्हणाला, ईशानची निवड करण्याचा निर्णय पूर्णपणे मनाचा कौल आणि काही आकडेवारी पाहून घेतला होता. आम्हाला टॉप ऑर्डरमध्ये अधिक आक्रमकता (Fire power) हवी होती.

सूर्याने पुढे सांगितले, मी ईशानला फोन केला आणि विचारलं ‘छोटू, वर्ल्ड कप जिंकवून देणार का?’ त्यावर ईशानने उत्तर दिले, ‘फक्त विश्वास ठेवा.’ त्यावर मी म्हणालो, ‘चल, केला तुझ्यावर विश्वास. त्यामुळे गिलच्या ठिकाणी ईशान किशनला विश्वचषकाच्या संघात स्थान मिळाले आणि त्याने आपल्या निवडीचे सोने करत चमकदार कामगिरी करून दाखवली.

Comments are closed.