राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि ‘रॉ’वर बंदी घाला, अमेरिकेतील धार्मिक स्वातंत्र्य आयोगाने केली शिफारस

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

धार्मिक स्वातंत्र्याचे गंभीर उल्लंघन केल्या प्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुस्थानची गुप्तचर संस्था ‘रॉ’वर (रिसर्च अँड अॅनालिसीस विंग) बंदी घालण्याची मागणी अमेरिकेतील धार्मिक स्वातंत्र्य आयोगाने ट्रम्प सरकारकडे केली आहे. आरएसएस व ‘रॉ’च्या अमेरिकेतील मालमत्ता गोठवून त्यांच्या प्रमुख प्रतिनिधींना अमेरिकेत प्रवेशबंदी करा, अशी शिफारसही आयोगाने आपल्या अहवालात केली आहे.

‘‘हिंदुस्थानात धार्मिक स्वातंत्र्याचा संकोच होत आहे. तेथील सरकारेच धार्मिक अल्पसंख्याकांना व त्यांच्या प्रार्थना स्थळांना लक्ष्य करत आहेत,’’ असे अहवालात म्हटले असून हिंदुस्थानला ‘विशेष चिंताजनक’ देशांच्या यादीत टाकले आहे. ‘‘संरक्षण आणि इतर व्यापारी करार करताना अमेरिका सरकारने धार्मिक स्वातंत्र्याचा मुद्दा विचारात घ्यावा. हिंदुस्थानला शस्त्रास्त्र विकू नयेत,’’ अशी शिफारसही करण्यात आली आहे. यूएसच्या धार्मिक स्वातंत्र्य आयोगाच्या अहवालात महाराष्ट्राचाही उल्लेख आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि ओडिशातील जातीय हिंसाचाराचे दाखले देण्यात आले असून आरएसएस प्रणित विश्व हिंदू परिषदेसारख्या संघटनांना यासाठी दोषी धरले आहे.

Comments are closed.