अभिजित आणि सोनालीने मारली बाजी
शिवशंकर उत्सव मंडळ आयोजित भारत पेट्रोलियम पुरस्कृत दुसऱया राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात पुण्याच्या आंतरराष्ट्रीय कॅरमपटू अभिजित त्रिपनकरने मुंबईच्या राहुल सोळंकीवर 25-13, 23-12 असा एकतर्फी विजय मिळवून विजेतेपद काबीज केले. तर महिला एकेरीच्या अंतिम फेरीत मुंबईच्या युवा कॅरमपटू सोनाली कुमारीने मुंबईच्या रिंकी कुमारीला तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत 11-25, 16-14 व 25-8 असे पराभूत करून या गटाचे विजेतेपद पटकावले. पुरुष गटात तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत जळगावच्या संदीप दिवेने रायगडच्या राजेश गोहीलवर 23-18, 25-6 अशी सहज मात केली. तसेच महिलांच्या गटात मुंबईच्या मिताली पाठकने ठाण्याच्या चैताली सुवारेला 13-12, 1-25 व 25-0 असे नमवत तिसरे स्थान मिळवले.
महाराष्ट्र पॅरम संघटना व मुंबई जिल्हा कॅरम संघटनेच्या मान्यतेने झालेल्या या स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा आमदार सुनील शिंदे यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी कॅरम संघटनेचे अरुण केदार, मंडळाचे अध्यक्ष शिवाजी शिंदे, प्रवीण चौधरी, प्रमुख कार्यवाह जितेंद्र चव्हाण, स्पर्धाप्रमुख कृष्णकांत परब, राष्ट्रीय कबड्डीपटू विजय घाडीगावकर आदी उपस्थित होते.
अमित, अनंतची आगेकूच
सीसीआय आयोजित विल्सन जोन्स बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरू असलेल्या सीसीआय स्नूकर क्लासिक 2026 स्पर्धेमध्ये अमित सप्रू, एस. अनंत, आदित्य अग्रवाल आणि आशित पंडयाने पाचवी फेरी गाठली.
चौथ्या फेरीत अमितने विवेक शहाचा 4-0 (58-50, 60-26, 64-19, 66-22) असा पराभव केला, तर एस. अनंतने सुनील जैनवर 4-1 (67-38, 66-38, 24-60, 77-35, 79-61) असा विजय मिळवला. दुसऱया एका सामन्यात आदित्यने मयूर गर्गवर 4-30 (21-68, 45-55, 78(55)-0, 72-49, 38-63, 67-60, 68-20 अशी मात केली. आशितने विवेक नारायणला चुरशीच्या लढतीत 4-3 (70-32, 53-66, 67-38, 48-61, 56-48, 64-74, 57-14) असे रोखले.
मागील सत्रात प्रो लीगमध्ये नऊ संघांमध्ये अखेरच्या स्थानावर राहिल्यानंतर हिंदुस्थानला बाहेर पडावे लागले होते. मात्र त्या अपयशाला विसरत आता हिंदुस्थानी खेळाडू नव्या जोमाने मैदानात उतरणार आहेत. या स्पर्धेत हिंदुस्थानबरोबरच यजमान न्यूझीलंड, अमेरिका, जपान, कोरिया, चिली, स्कॉटलंड आणि फ्रान्स हे संघही आव्हान उभे करणार आहेत. त्यामुळे ऑकलंडमध्ये हॉकीच्या रणांगणावर चुरशीच्या लढती रंगण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, पुरुषांची नेशन्स कप स्पर्धा केपटाऊन येथे 11 ते 20 जूनदरम्यान होणार आहे. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, फ्रान्स, कोरिया, जपान, वेल्स, मलेशिया, आयर्लंड आणि स्कॉटलंड या संघांचा सहभाग असणार आहे.
Comments are closed.