घाऊक महागाईचा दर १२ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे.
फेब्रुवारीत 2.13 टक्क्यांवर पोहोचला : अन्नधान्याच्या किमतीत वाढ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
फेब्रुवारी महिन्यात घाऊक महागाई दर वाढून 2.13 टक्क्यांवर पोहोचला आहे. हे प्रमाण 12 महिन्यांचे उच्चांकी ठरले आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये घाऊक महागाई दर 2.38 टक्के राहिला होता. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने सोमवारी घाऊक महागाई दराचे आकडे जारी केले आहेत. तर यापूर्वी जानेवारी 2026 मध्ये घाऊक महागाई दर 1.81 टक्के होता. तर डिसेंबरमध्ये हा आकडा 0.83 टक्क्यांवर होता.
अमेरिका-इस्रायल यांचे इराणसोबतचे युद्ध दीर्घकाळ चालल्यास कच्च्या तेलाच्या किमती 150 डॉलर्स प्रतिबॅरलपर्यंत पोहोचू शकतात असे तज्ञांचे मानणे आहे. यामुळे पेट्रोल-डिझेग महाग होऊ शकते, ज्यामुळे मालवाहतुकीचा खर्च वाढेल आणि फळे-भाज्यांसमवेत प्रत्येक आवश्यक सामग्रीची किंमत वाढणार आहे. इराण युद्धाचा परिणाम म्हणजे आता भारतासह जगभरातील देशांमध्ये महागाईचे संकट उभे ठाकण्याची शक्यता आहे.
दैनंदिन वापराच्या सामग्रीवरील महागाई दर 2.21 टक्क्यांवरून वाढत 3.27 टक्के झाला आहे. अन्नधान्याचा महागाई दर उणे 1.41 टक्क्यांवरून वाढत 1.85 टक्के झाला आहे. इंधन अन् ऊर्जेचा घाऊक महागाई दर उणे 4.01 टक्क्यांवरून वाढत उणे 3.78 टक्क्यांवर पोहोचला आहे. निर्मित उत्पादनांचा घाऊक महागाई दर 2.86 टक्क्यांवरून वाढत 2.92 टक्के राहिला आहे.
Comments are closed.