बुकिंग एकाच्या नावाने आणि गॅसची डिलिव्हरी परस्पर दुसऱ्यालाच, मनसे नेत्याने प्रकार आणला उघडकीस
चंद्रपूर शहरातील गॅस वितरण प्रणालीमध्ये मोठा गोंधळ सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. बुकिंग एका ग्राहकाच्या नावाने असताना प्रत्यक्षात सिलेंडरची डिलिव्हरी दुसऱ्यालाच दिली जात असल्याचा प्रकार मनसे नेते सचिन भोयर यांनी उघडकीस आणला आहे. या प्रकारामुळे ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
चंद्रपूर शहरातील बंगाली कॅम्प, MEL प्रभागातील ‘सुविधा गॅस एजन्सी’ मध्ये हा प्रकार घडला आहे. अनेक दिवसांपासून ग्राहकांना वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी होत्या. मात्र, जेव्हा सचिन भोयर यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला, तेव्हा एजन्सीच्या भोंगळ कारभाराचा पर्दाफाश झाला. ज्या ग्राहकांनी सिलेंडर घेतला नाही तरी अशा ही ग्राहकांच्या नावाने डिलीवर सिलेंडर दाखवण्यात येत असल्याच भोयर यांनी आरोप केला आहे. गरिबांच्या हक्काचा गॅस जातोय कुठे, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. एकीकडे महागाईमुळे सामान्य जनता होरपळत असताना, दुसरीकडे गॅस एजन्सीच्या अशा बेजबाबदार कारभारामुळे संताप व्यक्त होत आहे.
Comments are closed.