इराणसोबतच्या युद्धावरून ट्रम्प प्रशासनात फूट, वरिष्ठ अधिकाऱ्याचा गंभीर आरोप करत राजीनामा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिका–इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एक मोठा राजकीय वाद समोर आला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनातील वरिष्ठ दहशतवादविरोधी अधिकारी जो केंट यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत गंभीर आरोप केले आहेत. जो केंट यांनी राजीनामा देताना स्पष्टपणे म्हटले की, इराणकडून अमेरिकेला कोणताही तात्काळ धोका नव्हता. तरीही अमेरिकेने इराणसोबत युद्धाचा निर्णय घेतला. त्यामुळेच या निर्णयाशी सहमत नसल्याने राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

केंट यांनी आपल्या राजीनाम्यामध्ये केलेल्या दाव्यानुसार, हे युद्ध इस्रायलने केलेल्या दबावामुळेच सुरु करण्यात आले आहे. मूळात हा युद्धाचा निर्णय अमेरिकेच्या राष्ट्रीय हिताशी पूर्णपणे सुसंगत नव्हता. केंट यांच्या राजीनाम्यानंतर आता ट्रम्प प्रशासनातील अंतर्गत मतभेद हे चव्हाट्यावर आले आहेत. यातील प्रमुख बाब म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेसारख्या महत्त्वाच्या पदावर असणाऱ्या व्यक्तीने केलेला हा विरोध असल्याने आता ट्रम्प यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.

2026 मध्ये अमेरिका आणि इस्रायल यांनी इराण विरोधात कारवाई सुरू केल्यानंतर मध्यपूर्वेत तणाव प्रचंड वाढला आहे.

Comments are closed.