बाहेरच्या राज्यांमधून आणलेल्या वाहनांवर काही निर्बंध लावणार का? त्यांचे चेकिंग कसे करणार? आदित्य ठाकरे यांचा सवाल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

“राज्यात परराज्यातून मोठ्या प्रमाणावर वाहने आणली जातात आणि ती कायमस्वरूपी महाराष्ट्रातच चालवली जातात. अशा वाहनांच्या तपासणीसाठी सरकारकडे काय यंत्रणा आहे? या वाहनांवर सरकार काही निर्बंध किंवा पाबंदी लावणार आहे का?” असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासोनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज विधानसभेत उपस्थित केला.

विधानसभेत वाहन क्षेत्राशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करताना आदित्य ठाकरे यांनी तंत्रज्ञान आणि सुरक्षेच्या बाजूने सरकारला काही महत्त्वाचे प्रश्न विचारले. आदित्य ठाकरे म्हणाले की, “व्हिंटेज कारची आपण स्पष्ट व्याख्या ठरवणार आहोत का? आताच्या गाड्यांचे मेकॅनिझम आता पूर्णपणे इलेक्ट्रिक आणि सॉफ्टवेअरवर आधारित असल्याने, त्यातील ‘सेफ्टी आणि सिक्युरिटी’ सुनिश्चित करण्यासाठी AR आणि AI च्या माध्यमातून अद्ययावत चेकिंग यंत्रणा राबवणार का? जे बाहेरच्या राज्यांमधून गाड्या आणतात आणि मग इथेच स्थायिक होऊन चालवतात. त्यांचे चेकिंग आपण कसे करणार आहोत? त्यांच्यावर काही पाबंदी लावणार आहोत का?

Comments are closed.