कोण आहे कुलदीप यादवची पत्नी? दोघांची पहिली भेट कुठे झाली? लव्ह मॅरेज की अरेंज? जाणून घ्या सविस्तर

2026 चा टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) 14 मार्च, शनिवारी मसुरीमध्ये लग्नगाठ बांधली. कुलदीपच्या पत्नीचे नाव वंशिका सिंग आहे. पण भारतीय फिरकीपटू कुलदीपची ही पत्नी नक्की कोण आहे? या दोघांची पहिली भेट कुठे झाली? कुलदीपचे हे ‘लव्ह मॅरेज’ आहे की ‘अरेंज मॅरेज’?
कुलदीपची पत्नी वंशिका सिंग ही लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. तिने ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथून तिचे मास्टर्स पूर्ण केले असून भारतात ती LIC मध्ये प्रशासकीय अधिकारी (Administrative Officer) म्हणून कार्यरत आहे. या दोघांचा साखरपुडा 4 जून 2025 रोजी लखनौमध्ये एका पारंपारिक सोहळ्यात पार पडला होता. खरं तर हे दोघे नोव्हेंबर 2025 मध्येच लग्न करणार होते, पण कुलदीपच्या बिझी शेड्युलमुळे लग्नाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती.
कानपूरचा राहणारा कुलदीप यादव आणि त्याची पत्नी वंशिका हे दोघेही कानपूरचेच आहेत. कुलदीप आणि वंशिका हे बालपणीचे मित्र असून ते एकमेकांना खूप आधीपासून ओळखतात. काही रिपोर्ट्सनुसार, केवळ कुलदीप आणि वंशिकाच मित्र नाहीत, तर त्यांची कुटुंबे देखील एकमेकांच्या खूप जवळची आहेत. कुलदीपचे घर कानपूरच्या ‘लाल बंगला’ परिसरात आहे, तर वंशिका ‘श्याम नगर’ येथील रहिवासी आहे. कुलदीपने आपल्या बालपणीच्या मैत्रिणीशी लग्न केले आहे. त्यांनी स्वतः हे लग्न ‘लव्ह’ आहे की ‘अरेंज’ याबद्दल काहीही स्पष्ट केलेले नाही. मात्र, हे दोघे एकमेकांना लहानपणापासून ओळखत असल्यामुळे हे केवळ ‘अरेंज मॅरेज’ नसावे, असे मानले जात आहे.
दीर्घकाळ कुलदीप यादवसोबत असूनही वंशिका प्रसिद्धीच्या झोतात (Limelight) कधीच आली नाही. इंटरनेटवरही तिच्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. कदाचित वंशिका सोशल मीडियावर नाही, कारण कुलदीपने लग्नाचे फोटो शेअर करताना तिला टॅग केलेले नव्हते.
Comments are closed.