समान नागरी संहितेसाठी गुजरातची तयारी

गांधीनगर:

गुजरातमध्ये समान नागरी संहितेवर स्थापन समितीने मंगळवारी स्वत:चा अहवाल मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना सोपविला आहे. निवृत्त न्यायाधीश रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखालील समितीने विवाह, घटस्फोट, उत्तराधिकार आणि दत्तक विधानाशी निगडित प्रकरणांमध्ये समान कायदा लागू करण्याची शिफारस केली आहे. अहवालात महिलांच्या अधिकारांची सुरक्षा आणि सर्व नागरिकांसाठी समान कायदेशीर चौकटीवर जोर देण्यात आला आहे. समितीने राज्यभरात विविध समुदायांशी संवाद साधत हा अहवाल तयार केला आहे. या अहवालावर विधानसभेत 24 मार्च रोजी चर्चा होणार आहे.

Comments are closed.