रमजान महिन्यात मृत्यूचा तांडव, अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूंचा संताप; म्हणाले, पाकिस्तान अन् इस्र

अफगाणिस्तान काबुलमध्ये पाकिस्तानचा हवाई हल्ला मराठी बातम्या :पाकिस्तानच्या लष्कराने काबुलवर  (Pakistan Airstrike On Afghanistan Kabul) केलेल्या हवाई हल्ल्यात 400 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असून सुमारे 250 जण जखमी झाले आहेत. इस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तानच्या माहितीनुसार, सोमवारी रात्री काबुलमधील रहिवाशी परिसर आणि रुग्णालयांना लक्ष्य करण्यात आले. पाकिस्तानी हवाई दलाने रुग्णालय आमि रहिवाशी भागांवर बॉम्बचा वर्षाव केला. या घटनेनंतर अफगाणिस्तानचे दिग्गज क्रिकेटपटू राशिद खान, मोहम्मद नबी आणि अजमतुल्लाह उमरझई यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

राशिद खान काय म्हणाला? (Rashid Khan on Pakistan Airstrike In Afghanistan Kabul)

राशिद खान यांनी ‘X’ वर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, काबुलमधील या हवाई हल्ल्यांमुळे निरपराध नागरिकांचे बळी गेल्याच्या बातम्या अतिशय वेदनादायक आहेत. नागरिकांची घरं, शैक्षणिक संस्था किंवा वैद्यकीय सुविधा यांना टार्गेट करणं, जाणूनबुजून असो वा चुकून हा सरळ युद्धगुन्हा आहे. विशेषतः पवित्र रमजान महिन्यात मानवी जीवाबद्दल अशी बेफिकिरी अत्यंत निंदनीय आणि चिंताजनक आहे.

त्याने पुढे संयुक्त राष्ट्र आणि मानवाधिकार संघटनांना या घटनेची सखोल चौकशी करून दोषींना शिक्षा देण्याची मागणी केली. “या कठीण काळात मी माझ्या अफगाण बांधवांसोबत उभा आहे. आपण या दुःखातून नक्की सावरू,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मोहम्मद नबी काय म्हणाला? (Mohammad Nabi on Pakistan Airstrike In Afghanistan Kabul)

मोहम्मद नबी याने तीव्र शब्दांत प्रतिक्रिया देत सांगितलं की, काबुलमधील एका रुग्णालयात आशेचा किरणच विझला. उपचारासाठी आलेल्या तरुणांना पाकिस्तानी हल्ल्यात जीव गमवावा लागला. “आई दारात उभ्या राहून आपल्या मुलाच्या नावं हाक मारत होती, पण रमजानच्या 28व्या रात्री त्यांचे जीव निर्दयीपणे हिरावले गेले,” असे भावनिक शब्द त्यांनी व्यक्त केले.

अजमतुल्लाह उमरझई काय म्हणाला? (Azmatullah Umarzai on Pakistan Airstrike In Afghanistan Kabul)

अजमतुल्लाह उमरझई याने लिहिले की, स्फोटानंतर रुग्णालयातून उसळणाऱ्या ज्वाळा आकाशात झेपावताना दिसत होता. रमजानचा उपवास सोडल्यानंतर काही क्षणांतच अनेक निरपराधांचे प्राण गेले, तर अनेक जखमी झाले. “आज काबुल शोकमग्न आहे. पीडित कुटुंबीयांसोबत माझ्या संवेदना आहेत. आम्ही न्याय आणि शांततेसाठी प्रार्थना करतो,” असे त्यांनी म्हटले.

नवीन उल हकचा मनस्ताप (अफगाणिस्तान काबुलमध्ये पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यावर नवीन उल हक)

अफगाण खेळाडू नवीन उल हकने यावर आपला संताप व्यक्त केला असून, सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की पाकिस्तान आणि इस्रायलमध्ये कोणताही फरक नाही. फेसबुक पोस्टमध्ये नवीन उल हकने लिहिले, “इस्रायली आणि पाकिस्तानी राजवटींमध्ये कोणताही फरक शोधणे कठीण आहे.”

हे ही वाचा –

Mumbai Indians IPL 2026 : रोहित, सूर्या, पांड्या अन्…. आयपीएलच्या पहिल्या सामन्यात अशी असणार मुंबई इंडियन्सची तगडी Playing 11

आणखी वाचा

Comments are closed.