इतिहासाची पुनरावृत्ती झाली तर पाकिस्तानला महाग पडेल, क्रिकेटपटूचा पाकड्यांना इशारा
पाकिस्ताने मंगळवारी पहाटे अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील एका रुग्णालयावर एअरस्ट्राईक केला. या हल्ल्यात चारशेहून अधिक जणांचा मृत्यू झाला तर व 250 हूनअधिक जण जखमी झाले होते. या हल्ल्याचा जगभरातून निषेध करण्यात आला.
या हल्ल्याचा अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू आणि आयपीएलमध्ये आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेणारा क्रिकेटपटू अल्लाह गझनफर याने पाकिस्तानला फटकारले आहे. गझनफरने सोशल मीडियावरून एक पोस्ट शेअर करत पाकिस्तानवर निशाणा साधला तसेच हिंदुस्थानकडे मदतीची देखील मागणी केली.
ज्या लोकांकडे उपचारासाठी देखील पैसे नाहीत अशा लोकांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयावर हल्ला करून तुम्ही त्यांना मारले. त्यांना नेमके काय सिद्ध करायचे आहे, हेच मला समजत नाहीये. ते येतात आणि सामान्य जनतेला लक्ष्य करतात, हे आम्हाला कदापि मान्य नाही. अफगाणिस्तान हे कधीही सहन करणार नाही “अफगाणिस्तानचा इतिहास सर्वांनाच ठाऊक आहे. जर त्या इतिहासाची पुनरावृत्ती झाली, तर ते पाकिस्तानला महाग पडेल.” असा इशारा त्याने दिला आहे.
Comments are closed.