22 व्या वर्षी 100 पुत्रांची आई बनलेली महाभारतची ही अभिनेत्री, 38 वर्षानंतर इतकी बदलली की ओळखनही अवघड – Tezzbuzz
बॉलीवूड चित्रपटापेक्षा दूरदर्शनवरील अनेक मालिका अशा आहे ज्या प्रेक्षकांना त्यांच्या कथांनी आणि कलाकारांच्या अभिनयाने भुरळ घातली. त्या मालिकांची कथा आणि कालावधी अनेक वर्षांपूर्वी संपून गेला असल्या तरी दूरदर्शनवर रिपीट मालिका सुरू झाल्या की प्रेक्षक आजही आवडीने त्या मालिका पाहतात. अशीच एक मालिका म्हणजे महाभारत. जी प्रचंड गाजले आणि आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते. तसेच या मालिकेतील कलाकार सुद्धा त्याच पात्राच्या नावाने ओळखले जाऊ लागले. महाभारत सिरीयल मधील अशीच एक व्यक्ती म्हणजे वयाच्या 22 व्या वर्षी गांधारीची भूमिका साकारलेली रेणुका इसरानी.
बी. आर. चोप्रा यांची ‘महाभारत’ ही लोकप्रिय मालिकांपैकी एक होती, ज्यात पंकज धीर, मुकेश खन्ना, पुनीत इस्सार, नितीश भारद्वाज आणि रूपा गांगुली यांसारखे कलाकार होते. तर महाभारतात गांधारीची भूमिका साकारली तेव्हा रेणुका इसरानी फक्त 22 वर्षांच्या होती. याचा अर्थ असा की, त्यांनी वयाच्या 22 व्या वर्षी 100 मुलांच्या आईची भूमिका साकारली.तर पडद्यावरील मुलगा, दुर्योधन, पुनीत इस्सार, त्यांच्यापेक्षा सात वर्षांनी मोठा होते. मालिका प्रसारित होऊन 38 वर्षे उलटली आहेत आणि या काळात रेणुका इसरानींमध्ये लक्षणीय बदल झाला आहे.
रेणुका (Renuka)इसरानीं आता त्या 59 वर्षांच्या आहेत. त्यांच्यात इतका बदल झाला आहे की, पहिल्या नजरेत लोकांना ओळखणे कठीण आहे की त्या त्याच रेणुका आहेत. ज्यांनी महाभारतात गांधारीची भूमिका साकारली होती. आजही तिच्या चेहऱ्यावर साधेपणा झळकतो. आता रेणुकाने अभिनयातून निवृत्ती घेतली असून ती प्रसिद्धीपासून दूर साधे जीवन जगत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
दिल्लीत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात, ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांचा होणार सन्मान
पोस्ट 22 व्या वर्षी 100 पुत्रांची आई बनलेली महाभारतची ही अभिनेत्री, 38 वर्षानंतर इतकी बदलली की ओळखनही अवघड वर प्रथम दिसू लागले दैनिक बोंबाबोंब.
Comments are closed.