प्रसिद्ध ‘डोरेमॉन’ मालिकेचे दिग्दर्शक त्सुतोमू शिबायामा यांचे वयाच्या 84 व्या वर्षी निधन..! – Tezzbuzz
त्सुतोमू शिबायामा हे एक दिग्गज दिग्दर्शक होते. त्याने अनेक उत्तम कामगीरीने प्रेक्षकांची मने जिंकली मात्र आता यांचे वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले आहे. वयाच्या 84 व्या वर्षी फुफ्फुसाच्या कर्करोगाशी लढताना त्याचे निधन झाले आहे.तर या दिग्गज दिग्दर्शकाने डोरेमॉन हा चित्रपट आणि मालिका याचे दिग्दर्शन केले. त्यांनी नोबिता आणि शिझुका या पात्रांची निर्मिती करून त्यांना लोकप्रिय केले, तसेच हा शो इतका गाजला की आजही आठ ते दहा वयोगटातील लोक लहान मुले हा शो आवडीने पाहतात.
त्सुतोमू शिबायामा यांचे 6 मार्च रोजी निधन झाले. मात्र आता अधिकृत वेबसाइटवर दिग्दर्शकाच्या निधनाची अधिकृत घोषणा केली. त्सुतोमू शिबायामा यांचा जन्म 1914 मध्ये झाला. जपानी ॲनिमेशनमधील सर्वश्रेष्ठ दिग्दर्शकांपैकी एक म्हणून त्यांना ओळखले जाते. तर त्यांनी 22 डोरेमॉन चित्रपटांचे दिग्दर्शन केले.
त्सुतोमू शिबायामा हे 1984 ते 2005 पर्यंत, ते ‘डोरेमॉन‘ (doraemon)या टीव्ही ॲनिमे मालिकेचे मुख्य दिग्दर्शक होते. त्यांनी ‘नोबिता अँड द कॅसल अंडरसी डेव्हिल’ आणि ‘डोरेमॉन: नोबिता इन द वन-नान स्पेसटाइम ओडिसी’ यांसारख्या अनेक ॲनिमे चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहे. त्यांनी चिबी मारुको, निनतामा रंतारो, माझिमे नी फुमाजिमे आणि काकेसू झोरोरी यांचेही दिग्दर्शन केले. 2012 मध्ये, त्सुतोमू शिबायामा यांना जपानी एजन्सी फॉर कल्चरल अफेयर्स द्वारे ॲनिम उद्योगातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर यांच्या मृत्यूची बातमी कळताच डोरेमॉनच्या चाहत्यांना धक्का बसला. त्याच्या जाण्याने चित्रपटसुष्टिचे मोठे नुकसान झाले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
अल्लू अर्जुनने केले रणवीर सिंग अभिनीत ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटाचे कौतुक
Comments are closed.