‘डोरेमॉन’चे दिग्दर्शक त्सुतोमु शिबायमा यांचे निधन; वयाच्या 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

लहान मुलांचा आवडता कार्टून शो ‘डोरेमॉन’चे दिग्दर्शक आणि ज्येष्ठ जपानी चित्रपट निर्माते, अ‍ॅनिमेशन दिग्दर्शक त्सुतोमु शिबायमा यांचे निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. शिबायमा फुफ्फुसाच्या कर्करोग झाला होता. गेले अनेक दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर उपचारादरम्या त्यांची प्राणज्योत मालवली.

प्रसिद्ध जपानी अ‍ॅनिमेशन स्टुडिओ ‘एशिया-डो’ने दुजोरा दिला आहे. शिबायमा यांनी या स्टुडिओमध्ये उच्चस्तरीय नेतृत्व पदे भूषवली होती. स्टुडिओने अधिकृत निवेदन जारी करत कंपनीचे माजी अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी त्सुतोमु शिबायमा यांचे निधन झाल्याचे म्हटले आहे.

‘डोरेमॉन’ ही ॲनिमेटेड कार्टून मालिका आणि तिच्यावर आधारित चित्रपटांमुळे शिबायमा यांना खरी ओळख मिळाली. आपल्या कारकिर्दीत त्यांनी 20 वर्षांहून अधिक काळ ‘डोरेमॉन’ चित्रपट मालिकेचे (फ्रँचायझीचे) नेतृत्व केले. शिबायमा यांनी ॲनिमेशन दिग्दर्शनाच्या क्षेत्रात एक भक्कम पाया रचला होता. त्यांनी ‘Dokonjo Gaeru’ आणि ‘Ganso Tensai Bakabon’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांसह अनेक उल्लेखनीय प्रोजेक्टवर त्यांनी काम केले.

Comments are closed.