अमेरिकेचे परराष्ट्र सचिव आणि संरक्षण सचिव यांच्या निवासस्थानी संशयास्पद ड्रोन दिसताच दोघेही अंडरग्राऊंड
मध्य-पूर्वेतील संघर्ष दिवसेंदिवस भीषण होत चालला आहे. युद्धजन्य परिस्थिती असतानाच वॉशिंग्टनमधील एका अमेरिकी लष्करी तळावरून एक संशयास्पद ड्रोन उडताना दिसले. यानंतर वॉशिंग्टन परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून अमेरिकी प्रशासन या ड्रोनबद्दल तपास करत आहे. ड्रोन ज्या ठिकाणी दिसले तेथे अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो आणि संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांचे निवासस्थान आहे. ड्रोन दिसल्यानंतर दोन्ही नेत्यांची ठिकाणे बदलण्यात आली असून त्यांना अज्ञात ठिकाणी पाठवण्यात आले आहे.
वॉशिंग्टन पोस्टनुसार, गुरुवारी पेंटागॉनजवळील एका अमेरिकी लष्करी तळावर एक संशयास्पद ड्रोन दिसले. यानंतर संपूर्ण परिसरात घबराट पसरली आहे. हा ड्रोन कुठून आला याबाबत अधिकारी तपास करत आहेत. ड्रोनच्या घटनेनंतर इराणची कारवाई अमेरिकेपर्यंत पोहोचली आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अमेरिकेत संशयास्पद ड्रोन दिसण्याची ही पहिलीच वेळ आहे. जर हा ड्रोन इराणी असल्याचे निष्पन्न झाले, तर अमेरिकेसाठी हा एक मोठा धक्का मानला जाईल. इराणी सरकार किंवा अमेरिकन प्रशासनाने या ड्रोनबाबत अद्याप कोणतेही निवेदन जारी केलेले नाही.
दरम्यान, इराण निर्णायक लढाईच्या मूडमध्ये आहे. जोपर्यंत अमेरिका माफी मागत नाही आणि नुकसान भरपाई देत नाही, तोपर्यंत युद्ध थांबणार नाही, असे इराणचे सर्वोच्च नेत्याने स्पष्ट केले आहे. अमेरिकेला कसे हरवायचे हे आपल्याला माहीत आहे, असे इराणचे म्हणणे आहे.
Comments are closed.