IPL आकडेवारी: जसप्रीत बुमराहविरुद्ध सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू, यादीत एक गोलंदाजही

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा टी२० क्रिकेटमधील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक. आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्सकडून खेळतो. त्याने आपल्या यॉर्कर, बाउंसर आणि व्हेरिएशनने विरोधी संघातील फलंदाजांना हैरान केले आहे. त्याच्याविरुद्ध षटकार मारणे काही सोपे नाही. आयपीएलमध्ये केवळ चार फलंदाजांनीच त्याच्याविरुद्ध ५ किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारले आहेत.

आयपीएलमध्ये बुमराहविरुद्ध सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सर्वात पहिल्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेचा एबी डिविलियर्स आहे. त्याने बुमराहने टाकलेल्या ८५ चेंडूचा सामना करताना ८ षटकार मारले आहेत. त्याने आपल्या विशिष्ट शैलीने बुमराहच्या यॉर्करचा सामना केला आहे. विराट कोहली या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.

विराटने बुमराहविरुद्ध १०१ चेंडूत १५० धावा केल्या आहेत. त्यामध्ये ६ षटकारांचा समावेश आहे. विराटने त्याच्या सातत्यपूर्ण फलंदाजीने आयपीएलमध्ये त्याच्याविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचही विक्रम केला आहे.

यादीत तिसऱ्या क्रमांकावर पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज आहे. जेपी डुमिनीने बुमराहविरुद्ध ३३ चेंडूत ७० धावा केल्या आहेत. त्यामध्ये ६ षटकारांचा समावेश आहेत. डुमिनीच्या अचूक शॉट मारण्याच्या क्षमतेने बुमराहला अधिक त्रास झाला आहे.

या यादीत शेवटच्या स्थानावर सनरायझर्स हैद्राबादचा कर्णधार पॅट कमिन्स आहे. त्याने बुमराहविरुद्ध ३४ चेंडूत ५४ धावा केल्या असून त्यामध्ये ५ षटकार मारले आहेत.

Comments are closed.