Dhurndhar 2 – चित्रपटात रणवीर सिंहच्या एन्ट्रीला वाजणारे गाणे आहे तीस वर्षे जुने, वाचा दिदी या गाण्याची रंजक कथा
‘धुरंधर’ चित्रपटातील अक्षय खन्नाची ‘शेर-ए-बलुच’ स्टाईल अजूनही चित्रपटप्रेमींच्या मनात ताजी आहे. बहरीनी कलाकार फ्लिपार्चीच्या सुपरहिट गाणे ‘FA9LA’ वरील त्याची जादुई एन्ट्री आणि बलुच कॅम्पमधील त्याचा उत्स्फूर्त डान्स सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पण आता सध्या सर्वांचेच लक्ष रणवीर सिंहच्या एन्ट्रीकडे लागले आहे. रणवीरच्या एन्ट्रीला लागणारे दिदी हे गाणे एक नव्हे तर तीन दशके जुने आहे. रणवीरचे पात्र, ‘जसकिरत सिंग रंगी’ आता धुरंधर २ मध्ये नवीन ‘शेर-ए-बलुच’ म्हणून पडद्यावर धुमाकूळ घालत आहे. त्याचा एन्ट्री सीन अक्षय खन्नाच्या एन्ट्रीची आठवण करून देतो, पण यावेळी संगीत आणि शैली दोन्ही पूर्णपणे नवीन आणि वेगळे आहेत.
‘धुरंधर’च्या पहिल्या भागात अक्षय खन्नाचे स्वतःचे एक खास गाणे होते, ज्यामुळे प्रेक्षक नाचले होते. आता सिक्वेलमध्ये रणवीर सिंगला तोच दर्जा देण्यात आला आहे. जेव्हा रहमान डकैतच्या वेशात काळ्या कपड्यांमध्ये हमजा कॅम्पमध्ये प्रवेश करतो, तेव्हा त्याचे स्वागत केले जाते. विशेष म्हणजे, यावेळी ‘FA9LA’ ऐवजी, अल्जेरियन दिग्गज खालिद यांनी संगीतबद्ध केलेले ३४ वर्षे जुने अरबी गाणे ‘दिदी’ निवडले गेले आहे.
अल्जेरियन गायक खालिद हज इब्राहिम हे त्यांच्या ‘राई’ संगीतासाठी जगभरात ओळखले जातात. त्यांचे ‘दिदी’ हे गाणे, १९९२ मध्ये पहिल्यांदा प्रदर्शित झाले होते. जवळपास ३४ वर्षांनंतर, ‘धुरंधर २’ मुळे हे गाणे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
येथे ‘दिदी’ या शब्दाचा अर्थ ‘घेणे’ या संदर्भात वापरला आहे. हे गाणे त्या काळातील एक जागतिक चार्टबस्टर होते आणि २०१० च्या फिफा विश्वचषकादरम्यानही लोकप्रिय झाले होते.
‘दिदी’ची धून हिंदुस्थानी प्रेक्षकांसाठी नवीन नाही. ती यापूर्वी हिंदी चित्रपटांमध्ये अनेक वेळा दिसली आहे. १९९४ मध्ये, बप्पी लाहिरी यांनी ‘ब्रह्मा’ चित्रपटातील ‘सुनो सुनो मेरी रानी जी’ या गाण्यात याचा वापर केला. मूळ गाणे १९९५ च्या मल्याळम चित्रपट ‘हायवे’ मधील सिल्क स्मिताच्या एका दृश्यातही वापरले गेले होते. गोविंदा आणि राणी मुखर्जी अभिनीत २००० च्या ‘हद कर दी आपने’ या चित्रपटातही हे गाणे ऐकायला मिळाले होते.
Comments are closed.