Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर…
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर करुणा मुंडे (Karuna Munde) यांनी गंभीर आरोप करत त्यांचा तात्काळ राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. बलात्काराचा आरोप असलेल्या व्यक्तींशी संबंध ठेवणे आणि त्याच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे हे महिला आयोगाच्या अध्यक्षपदाला शोभणारे नाही, अशी टीका त्यांनी केली. रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेतला नाही तर आपण मंत्रालयाच्यासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा करुणा मुंडे यांनी दिला. रुपाली चाकणकरांमुळे राज्यातील महिलांना न्याय मिळत नसल्याचा आरोप करुणा मुंडे यांनी केला. बलात्कारी अशोक खरातसोबत रुपाली चाकणकर दिसतात, त्याच्या संस्थेमध्ये त्या संचालिका आहेत. त्यामुळे राज्य सरकारने रुपाली चाकणकरांचा तातडीने राजीनामा घ्यावा अशी मागणी करुणा मुंडे यांनी केली.
1 एप्रिलपासून फास्टॅग टोल पास महागणार; नवा पास कसा मिळवायचा?
राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. FASTag Annual Pass आता महाग होणार असून 1 एप्रिल 2026 पासून नव्या दरांची अंमलबजावणी होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून (National Highways Authority of India NHAI) वार्षिक पासच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे.
Comments are closed.