कबड्डी, पैठणी, नृत्यापासून ते पाककलेपर्यंत…शिवडीत शिवसेनेचा अनोखा महोत्सव
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बाल विकास मित्र मंडळ, सिद्धी संस्कृती फाऊंडेशनच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सलग 11 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने ब गट कबड्डी स्पर्धा, एकेरी नृत्य स्पर्धा, समूह नृत्य स्पर्धा, महिलांसाठी खेळ खेळू पैठणीचा कार्यक्रम, पाककला स्पर्धा, ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान सोहळा, विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेला महोत्सवाचा शुभारंभ शिवसेना विभागप्रमुख आशीष चेंबूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. 18 मार्च ते 29 मार्च या कालावधीत शिवडीच्या बाल विकास मनोरंजन मैदान येथे हा महोत्सव पार पडणार आहे. यावेळी विधानसभाप्रमुख लता रहाटे, विधानसभा संघटक दिव्या घाडीगावकर, शाखाप्रमुख हनुमंत हिंदोळे, जयसिंग भोसले, महिला शाखा संघटक शुभदा पाटील, स्थानिक नगरसेविका सुप्रिया दळवी, माजी नगरसेविका, श्वेता राणे, वैभवी चव्हाण, बालविकास मंडळाचे अध्यक्ष मुपुंद परब, विकास मोरे, खजिनदार महेश पवार आदी उपस्थित होते.
Comments are closed.