सुपरहिट सीरिजच्या दुसऱ्या भागात पुनरागमन करणार अनन्या पांडे, प्राईम व्हिडिओवर गाजवली होती दमदार कामगिरी – Tezzbuzz

अनन्या पांडे ही एक बॉलीवूड मधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. जिने अनेक वेब सिरीज चित्रपट केले आणि उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात तिने घर निर्माण केली आहे. सध्या ती एका कारणामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. ते म्हणजे तिची एक वेब सिरीज येत आहे. तर ही सिरीज म्हणजे कॉल मी बे’ या वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये बेला ‘बे’ चौधरीच्या भूमिकेत अनन्या पांडे ही परतणार आहे.

अभिनेत्री अनन्या (ananya)पांडे गुरुवारी मुंबईत प्राईम व्हिडिओने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात करण्यात आली होती, या कार्यक्रमात, प्राईम व्हिडिओने या शोचा नवीन सीझन येत असल्याची आणि अनन्या पुन्हा एकदा मुख्य भूमिका साकारणार असल्याची पुष्टी केली. दुसऱ्या सीझनमध्ये, जेव्हा तिचा पूर्वाश्रमीचा पती परत येतो, तेव्हा बेचे आयुष्य अधिक गुंतागुंतीचे होते. तिला तिच्या आकर्षक बॉसविषयी आकर्षण वाटू लागते, ज्यामुळे ती द्विधा मनःस्थितीत सापडते, कारण तिला तिच्या भावना आणि वाढत्या करिअरमध्ये संतुलन साधण्यासाठी संघर्ष करावा लागतो.

पहिल्या सीझनमधील अनन्या पांडे ,वीर दास, श्रुती हासन, गुरफतेह पीरजादा, वरुण सूद, विहान समत, मुस्कान जाफरी, निहारिका लायरा दत्त आणि लिसा मिश्रा या कलाकारांचा समावेश आहे. अभिनेत्री मिनी माथूर देखील नवीन सीझनमध्ये सामील होणार आहे. अनन्या पांडे अभिनीत कॉल मी बे याचा पहिल्या सीझन सप्टेंबर 2024 मध्ये प्रदर्शित झाला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

मिर्झापूरलाही टक्कर देणारी नेटफ्लिक्सची ही सिरीज, IMDb वर 8.7 रेटिंग, तर आता ओटीटीवर धडाकेबाज एन्ट्री

Comments are closed.