धुरंदरने उडवला धुरळा, पहिल्याच दिवशी जमवला 100 कोटींचा गल्ला

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रणवीर सिंग याच्या ‘धुरंधर 2: द रिव्हेंज’ (Dhurandhar 2) या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी तब्बल शंभर कोटींचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी तब्बल १४५.५५ कोटी रुपयांची (पेड प्रिव्ह्यूसह) विक्रमी कमाई केली आहे. धुरंदरने पहिल्याच दिवशी कल्की, जवान सालार, बाहुबली या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत.

गेल्या तीन महिन्यांपासून प्रेक्षक धुरंदरच्या दुसऱ्या भागाची प्रतिक्षा करत होते, तो ‘धुरंधर 2: द रिव्हेंज’ गुरुवारी गुढिपाडव्याच्या मुहुर्तावर रिलीज झाला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी तब्बल 145.55 कोटी रुपयांची (पेड प्रिव्ह्यूसह) विक्रमी कमाई केली, यात 102 कोटी हे फक्त बॉक्स ऑफिसच्या गल्ल्यावर कमावले आहेत. तर धुरंदरच्या वर्ल्डवाईड कमाईने तब्बल 236 कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. ‘धुरंधर २’ हा ‘पुष्पा 2’ (१६४ कोटी) नंतर हिंदुस्थानच्या चित्रपटसृष्टीतील आजवरचा दुसरा सर्वात मोठा ओपनर ठरला आहे.

Comments are closed.