Israel Iran War – क्षेपणास्त्रांचे उत्पादन वेगाने सुरू, कोणतीही कमतरता नाही…; इराणचा खळबळजनक दावा
अमेरिका, इस्रायल-इराणचे युद्ध आता तिसऱ्या आठवड्यातही सुरू आहे. आम्ही इराण पूर्णपणे उद्ध्वस्त केला आहे. आता तिथे उद्ध्वस्त करण्यासारखे काही नाही, असा दावा अमेरिकेने केला आहे. तर आता इराणचे नेतृत्व संपुष्टात आले असून त्यांच्याकडे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र उत्पादन क्षमता शिल्लक नाही, असे इस्रायलने म्हटले आहे. मात्र, या दोन्ही देशांचा चांगलाच समाचार घेत इराणने पलटवार केला आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण युद्धात विजयाचा दावा केला. त्यांनी म्हटले की इराणचे नेतृत्व आता संपुष्टात आले आहे. तर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन युद्धात विजयाचा दावा केला आणि म्हटले की इराणकडे आता कोणतीही बॅलिस्टिक क्षेपणास्त्र उत्पादन क्षमता उरलेली नाही. अमेरिका आणि इस्रायलने इराणची क्षेपणास्त्र निर्मिती क्षमता नष्ट केल्याच्या दाव्यांच्या पार्श्वभूमीवर इराणने आता एक निवेदन जारी करत दोन्ही देशांवर पलटवार केला आहे.
क्षेपणास्त्रांचे उत्पादन वेगाने होत आहे, कोणतीही कमतरता नाही, असे इराणने स्पष्ट केले आहे. इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी दावा केला की इराणची बॅलिस्टिक क्षेपणास्त्र उत्पादन क्षमता नष्ट झाली आहे. इराणी लष्कराने म्हटले आहे की युद्धादरम्यानही आमचे क्षेपणास्त्र उत्पादन वेगाने सुरू आहे.
इराणच्या लष्कराने, इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) दावा केला आहे की, युद्धाच्या काळातही क्षेपणास्त्र उत्पादन अखंडपणे सुरू आहे. IRGC ने असेही म्हटले आहे की क्षेपणास्त्रांची कोणतीही कमतरता नाही आणि क्षेपणास्त्रांचे उत्पादन वेगाने होत आहे. IRGC चे हे निवेदन इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना दिलेले प्रत्युत्तर म्हणून पाहिले जात आहे.
इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्या वक्तव्याला हे प्रत्युत्तर म्हणून पाहिले जात आहे, ज्यात त्यांनी इराणची बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे बनवण्याची क्षमता पूर्णपणे नष्ट केल्याचा दावा केला होता. ते असेही म्हणाले की, इराणकडे ती क्षेपणास्त्रे नाहीत जी वापरण्याची धमकी ते देत आहेत. इराण आता जगाला ब्लॅकमेल करू शकत नाही.
इस्रायलच्या पंतप्रधानांनी दावा केला की, आम्ही इराणवर सर्वत्र हल्ला करत आहोत. इराणकडे आता युरेनियम समृद्ध करण्याची क्षमता राहिलेली नाही. आम्ही जिंकत आहोत आणि इराण नष्ट होत आहे. इराणी लोकांना स्वातंत्र्याचा हक्क देणे हे आमचे ध्येय आहे. होर्मुझच्या संदर्भात ते म्हणाले की, आता नवीन पर्यायांची गरज आहे.
इस्रायलने इराणच्या पार्स गॅस क्षेत्रावर हल्ला केला होता. प्रत्युत्तरादाखल, इराणने कतारपासून बहरीनपर्यंतच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पांवर प्रतिहल्ले केले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील गॅस क्षेत्रावरील हल्ल्याची माहिती नसल्याचे नाकारले आणि नेतान्याहूंना याची पुनरावृत्ती न करण्याचे आवाहन केले.
Comments are closed.