सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा, बहुमतात असणाऱ्या शिवसेना राष्ट्रवादीला मोठा धक्का

सातारा : सातारा जिल्हा परिषदेमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. स्थापनेनंतर प्रथमच सातारा जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाने सत्ता स्थापनेत यश मिळवले आहे. या निवडणुकीत भाजपाचे संख्याबळ केवळ 28 सदस्यांपर्यंत असताना, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राजकीय रणनीतीती आखून अतिरिक्त पाठिंबा मिळवत एकूण 33 सदस्यांचा पाठिंबा भाजपला मिळवून दिला आहे. त्यामुळं सातारा जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता आली आहे. भाजपाच्या प्रिया शिंदे यांची सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्ष पदी राजू भोसले यांना संधी मिळाली आहे. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

कोणत्या पक्षाकडे किती सदस्य आहेत?

सातारा जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे 20, शिवसेना शिंदे गटाकडे 15, काँग्रेसकडे 1, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे 1, भाजपकडे 27 तर अपक्ष 1 असे 65 सदस्यांचे बलाबल होते. भाजपच्या झालेल्या बैठकीला अपक्ष 1 धरुन 28 सदस्य उपस्थित होते. आजच्या निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीचे तीन सदस्य फोडले, तसेच शिवसेना शिंदे गटाचेही दोन सदस्य फोडले. त्यामुळं भाजपचे संख्याबळ 33 झाले.

भाजपाच्या प्रिया शिंदे यांची सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड

निर्णायक बहुमताच्या आधारे भाजपाच्या प्रिया शिंदे यांची सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्ष पदी राजू भोसले यांना संधी मिळाली आहे. या विजयामुळे केवळ सत्ता परिवर्तन झाले नाही, तर साताऱ्यासारख्या पारंपरिक राजकीय बालेकिल्ल्यात भाजपाने आपली मजबूत पकड निर्माण केली आहे. स्थानिक पातळीवरील सूक्ष्म नियोजन, प्रभावी संवाद आणि संघटन कौशल्य यामुळं भाजपाला हा ऐतिहासिक विजय मिळवता आला. सातारा जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच भाजपाचा झेंडा फडकला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची धुरंधर राजकीय खेळी मानली जात असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोननंतर भाजपने बाजी उलटवली असल्याचे बोलले जात आहे. भाजपच्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा एका मताने थरारक विजय हा साताऱ्यात भाजपाचा करिश्मा पुन्हा एकदा अधोरेखित करणारा विजय ठरला आहे.

सातारा जिल्हा परिषद एकूण संख्याबळ 65

भाजप – 27
राष्ट्रवादी – 20
शिवसेना – 15
काँग्रेस – 1
अपक्ष – 2

आजच्या निवडी मध्ये फुटलेले सदस्य

राष्ट्रवादी काँग्रेस

लता करणे – (बुध खटाव)
ऋतुजा जगताप – (फल्टन)
कामेश कांबळे – (सातारा)

अपहरणाच्या गुन्ह्याखाली राष्ट्रवादीचे उचलून नेलेले सदस्य

अनिल देसाई (मान)
संदीप मांडवे  (खटाव)

शिवसेनेचे फुलटेले सदस्य

हणमंत जगदाळे (कोरेगाव कुमठे)
सारिका फाळके (सतार रोड)

आणखी वाचा

Comments are closed.