वनडे वर्ल्ड कप 2027 साठी टीम इंडियाच्या निवडीबाबत 5 मोठ्या अपडेट्स समोर! काय आहे नेमका प्लॅन?

28 मार्चपासून आयपीएल 2026 चा थरार सुरू होणार आहे, पण त्याआधी भारतीय एकदिवसीय (ODI) संघ निवडीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. एका रिपोर्ट्सनुसार, मुख्य निवडकर्ते अजित आगरकर, प्रशिक्षक गौतम गंभीर, बीसीसीआय (BCCI) अधिकारी आणि कर्णधार यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे.

निवडकर्त्यांनी 2027 च्या वन-डे वर्ल्ड कपसाठी सुमारे 20 संभाव्य खेळाडूंची निवड (Shortlist) केली आहे. आयपीएल 2026 दरम्यान या सर्व खेळाडूंच्या कामगिरीवर आणि प्रगतीवर बारीक लक्ष ठेवले जाईल. निवड समितीचे सदस्य एस.एस. दास, आर.पी. सिंह, अजय रात्रा आणि प्रज्ञान ओझा हे स्वतः स्टेडियममध्ये उपस्थित राहून खेळाडूंच्या खेळाचे निरीक्षण करतील.

बीसीसीआयची अशी इच्छा आहे की, प्रत्येक निवडकर्त्याने आठवड्यातून किमान एक सामना तरी मैदानात जाऊन पहावा. अशा प्रकारे पाच निवडकर्ते मिळून आठवड्यातील पाच सामने थेट वेन्यूवरून कव्हर करतील, तर उर्वरित सामने टीव्हीच्या माध्यमातून पाहिले जातील. सध्या निवडकर्त्यांचे पूर्ण लक्ष फक्त 2027 च्या वर्ल्ड कपवर आहे. तूर्तास ते 2028 चा टी-20 वर्ल्ड कप किंवा लॉस एंजेलिस ऑलिम्पिकचा विचार करत नसल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

Comments are closed.