आयपीएल 2026 मध्ये इतक्या धावा करायच्या आहेत.., 19 व्या हंगामापूर्वी वैभव सूर्यवंशीचं मोठं विधान! जाणून घ्या नेमकं काय म्हणाला

राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan royals) संघ आयपीएल 2026 साठी पूर्णपणे सज्ज असून, त्यांच्याकडे मॅच विनर युवा खेळाडूंची मोठी फौज आहे. यात सर्वांचे लक्ष वेधून घेणारा खेळाडू म्हणजे वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi). सर्वात कमी वयाचा खेळाडू असूनही वैभवच्या कामगिरीकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे.

आयपीएल 2026 पूर्वी रवींद्र जडेजासोबत (Ravindra Jadeja) एका कार्यक्रमात सहभागी झाला असताना वैभवला त्याच्या या हंगामातील लक्ष्याबद्दल (Target) विचारण्यात आले. यावर त्याने मिश्किलपणे उत्तर दिले, जर तुम्ही असा प्रश्न विचारला, तर मी म्हणेन की मी 2000-3000 धावा करेन. त्याचे हे उत्तर ऐकून तिथे उपस्थित असलेले सर्वजण पोट धरून हसू लागले.

आजवर आयपीएलच्या एकाही हंगामात कोणत्याही फलंदाजाला 1000 धावांचा टप्पा ओलांडता आलेला नाही (विराट कोहलीचा 973 धावांचा विक्रम सर्वोच्च आहे). त्यामुळे एका मोसमात 2000-3000 धावा करणे अशक्य आहे. वैभवने हे विधान केवळ गंमत म्हणून केले होते. मात्र, त्याने या सीझनमध्ये 500 पेक्षा जास्त धावा केल्या, तर त्याचा भारतीय संघात निवडीचा दावा नक्कीच भक्कम होईल.

वैभव सूर्यवंशीची आतापर्यंतची कामगिरी बघायची झाल्यास, त्याने आयपीएल 2025 मधील 7 सामन्यांत 36 ची सरासरी आणि 206.55 चा जबरदस्त स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. तसेच आयपीएल इतिहासात सर्वात वेगवान शतक झळकावणारा तो भारतीय खेळाडू ठरला आहे.

या हंगामात सर्वच संघ वैभवसाठी खास रणनीती आखून मैदानात उतरतील, त्यामुळे त्याच्यावर कामगिरीचा दबाव असेल. तरीही राजस्थान रॉयल्सला त्याच्याकडून धडाकेबाज सुरुवातीची अपेक्षा आहे.

Comments are closed.