IPL 2026: संघ केवळ सूर्यवंशी आणि जयस्वालवर अवलंबून नाही.., आयपीएल 2026 पूर्वी कर्णधार रियान परागचे मोठे विधान

आयपीएल 2025 च्या उत्तरार्धात यशस्वी जयस्वाल (Yashsvi Jaiswal and Vaibhav Suryavanshi) आणि वैभव सूर्यवंशी या जोडीने राजस्थान रॉयल्ससाठी सलामी (Open) केली होती. 2026 च्या हंगामातही हीच जोडी मैदानात दिसण्याची शक्यता आहे. दरम्यान, राजस्थान रॉयल्सचा नवीन कर्णधार रियान परागने (Riyaan Parag) या जोडीबाबत आणि संघाच्या रणनीतीबाबत मोठे विधान केले आहे.

स्पर्धेपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्य प्रशिक्षक कुमार संगकारा आणि कर्णधार रियान पराग यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. यशस्वी आणि वैभवच्या जोडीबद्दल विचारले असता पराग म्हणाला, आमचा संघ केवळ एक किंवा दोन खेळाडूंवर अवलंबून राहू शकत नाही. जर आपल्याला स्पर्धा जिंकायची असेल, तर सर्वच फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. फक्त फलंदाजच नाही, तर ऑलराउंडरना त्यांची भूमिका चोख बजवावी लागेल आणि गोलंदाजांनाही महत्त्वाच्या वेळी विकेट्स काढाव्या लागतील.

समजा एखाद्या फलंदाजाने 700 धावा केल्या, तरी त्याला दुसऱ्या बाजूने इतर फलंदाजांची साथ मिळणे आवश्यक आहे, तरच संघ यशस्वी होईल. रियान परागने इतर 9 संघांना स्पष्ट संकेत दिले आहेत की, राजस्थान रॉयल्स हा केवळ काही स्टार खेळाडूंचा संघ नसून, तो पूर्णपणे सांघिक कामगिरीवर (Teamwork) भर देणार आहे.

Comments are closed.