300 बेकायदेशीर वेबसाइट्स आणि ॲप्सवर बंदी
ऑनलाइन स्पोर्ट्स बेटिंग प्लॅटफॉर्मचा समावेश : आतापर्यंत 8,400 प्लॅटफॉर्म्स ब्लॉक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अवैध ऑनलाईन जुगार आणि सट्टेबाजीविरोधात सरकारने मोठी कारवाई करत आणखी 300 वेबसाइट्स आणि अॅप्स ब्लॉक केले आहेत. सरकारी सूत्रांनुसार, आतापर्यंत एकूण 8,400 अशा प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यात आली आहे. यापैकी, ऑनलाइन गेमिंग कायदा लागू झाल्यापासून अंदाजे 4,900 वेबसाइट्स ब्लॉक करण्यात आल्या आहेत.
सरकारी सूत्रांनुसार, बंद करण्यात आलेले प्लॅटफॉर्म्स प्रामुख्याने अवैध ऑनलाइन सट्टेबाजी आणि आर्थिक व्यवहारात गुंतलेले होते. ते मोठ्या प्रमाणावर अवैध व्यवहार आणि जुगाराला प्रोत्साहन देत होते. हे गैरव्यवहार रोखण्यासाठी आयटी कायदा आणि इतर संबंधित कायद्यांनुसार सतत देखरेख आणि कारवाई केली जात आहे. ऑनलाइन गेमिंग कायद्याच्या अंमलबजावणीमुळे अशा प्लॅटफॉर्म्सविरुद्धच्या कारवाईला गती मिळाली आहे. डिजिटल स्पेस सुरक्षित करण्यासाठी आणि अवैध कारवायांना आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे, असा सरकारचा दावा आहे.
Comments are closed.