81 चेंडू, 193 धावा! भारताच्या 22 वर्षीय पोराचा रौद्रावतार, टी-20 क्रिकेटचा किंग Chris Gayle चा
आर्या देसाई वर्ल्ड रेकॉर्ड: टी-20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत आपण वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलचे वर्चस्व पाहिले आहे. त्याने आयपीएलमध्ये 175 धावांची तुफानी कामगिरी केली होती. मात्र आता एका भारतीय युवा खेळाडूने क्रिकेटच्या मैदानात असा काही धमाका केला आहे की संपूर्ण क्रीडाविश्व थक्क झाले आहे. गुजरातच्या आर्य देसाईने (Aarya Desai World Record) टी-20 क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे.
सूरत क्रिकेट टी-20 लीगमध्ये त्याने अवघ्या 81 चेंडूमध्ये तब्बल 193 धावांची तुफानी खेळी खेळली. ही स्पर्धा गुजरात क्रिकेट असोसिएशन (GCA) मान्यताप्राप्त असून, आर्यची ही खेळी टी-20 क्रिकेटमधील सर्वात मोठा वैयक्तिक स्कोर मानली जात आहे. स्थानिक हँडल्स आणि GCA च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरूनही या खेळीला टी-20 इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या म्हणून गौरवण्यात आले आहे. GCA चे सचिव अनिल पटेल यांनीही याची पुष्टी केली आहे. यापूर्वी टी-20 क्रिकेटमधील सर्वात मोठ्या धावसंख्येचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर होता. त्याने 2013 साली RCB कडून खेळताना 66 चेंडूमध्ये 175 धावांची धडाकेबाज खेळी केली होती.
🔥 एक स्टार इन द मेकिंग – आर्या देसाईची रेकॉर्डब्रेक खेळी! 🔥
वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी, गुजरातच्या स्वतःच्या आर्या देसाईने एक चित्तथरारक कामगिरी केली आहे जी संपूर्ण क्रिकेट सर्किटमध्ये प्रतिध्वनीत आहे! 💥
रणजी ट्रॉफीसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत गुजरातचे प्रतिनिधित्व… pic.twitter.com/CmZZePUePH— गुजरात क्रिकेट असोसिएशन (अधिकृत) (@GCAMotera) 20 मार्च 2026
रणजी ट्रॉफी आणि दिलीप ट्रॉफी सारख्या प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये गुजरातचे प्रतिनिधित्व केलेल्या आर्य देसाईने या लीगमध्ये आपल्या फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आपल्या या तुफानी खेळीत त्याने 21 चौकार आणि 14 षटकारांची आतषबाजी केली. सूरत क्रिकेट टी20 लीगचा हा सहावा हंगाम असून, यात राज्यातील सर्व जिल्ह्यांतील विविध वयोगटातील अव्वल खेळाडू सहभागी झाले आहेत.
आर्य देसाई यापूर्वी आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघाचा भाग होता. तसेच तो नियमितपणे नॅशनल क्रिकेट अकॅडमीच्या कॅम्पमध्ये सहभागी होत असतो. राज्यस्तरावर सातत्यपूर्ण कामगिरी, उत्कृष्ट तंत्र आणि आत्मविश्वासासाठी तो ओळखला जातो.
अनिल पटेल यांनी IANS शी बोलताना सांगितले, “आर्य ज्या प्रकारे फलंदाजी करत होता, तसं मी आजवर कुणालाही करताना पाहिलं नाही. ही खेळी सूरत जिल्हा क्रिकेट असोसिएशन आणि गुजरात क्रिकेट असोसिएशन मान्यताप्राप्त स्पर्धेत झाली आहे. राज्यातील 11 जिल्ह्यांतील सर्व संभाव्य खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.”
ते पुढे म्हणाले की, गेल्या तीन हंगामांपासून GCA महिलांसाठीही याच धर्तीवर स्पर्धा आयोजित करत आहे. तसेच अंडर-19, अंडर-23 आणि वरिष्ठ स्तरावरील सर्व खेळाडू या स्पर्धेत विविध संघांचे प्रतिनिधित्व करत आहेत.
आर्य देसाईच्या कामगिरीबद्दल बोलताना पटेल म्हणाले, “तो अत्यंत गुणी खेळाडू आहे. मागील रणजी हंगामात त्याने 500 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. तसेच व्हाईट-बॉल स्पर्धांमध्येही त्याने चांगली कामगिरी केली आहे. त्याला दिलीप ट्रॉफी संघातही स्थान मिळालं होतं आणि इमर्जिंग प्लेयर्स स्पर्धेसाठी भारताच्या अंडर-23 संघातही त्याची निवड झाली होती. त्याचं भविष्य खूप उज्ज्वल आहे.”
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.